वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, २१ आॅगस्ट रोजी आणखी ३० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोला येथे कोरोना बाधित आढळून आलेल्या कारंजा लाड शहरातील मोठे राम मंदिर परिसरातील ६९ वर्षीय व्यक्तीचा १५ आॅगस्ट २०२० रोजी मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद येथे कोरोना बाधित आढळून आलेल्या शिरपूर जैन येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा १८ आॅगस्ट २०२० रोजी मृत्यू झाल्याची, तसेच जिल्ह्याबाहेर ३ व्यक्ती कोरोना बाधित बाधित आढळल्याची नोंद झाली आहे.प्रशासनाला गुरुवारी रात्री व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील दत्त नगर ३, टिळक चौक १, कोल्हाटकरवाडी १, चामुंडादेवी १, सिव्हील लाईन्स १, जुनी जिल्हा परिषद १, जुनी नगरपरिषद १, ईश्वरी कॉलनी १, महाराणा प्रताप चौक १, ढिल्ली १, वारा जहांगीर १, अनसिंग १, मालेगाव शहरातील मेन रोड परिसर १, बसस्थानक परिसर ५, शिरपूर जैन परिसर ६, कारंजा लाड शहरातील महावीर कॉलनी परिसर १, शिवानीनगर परिसर १, मंगरूळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसर १, तर रिसोड तालुक्यातील धोडप बोडकी येथील १ व्यक्ती मिळून ३० जण कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे, तसेच ५३ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात वाशिम शहर काटीवेस परिसर ७, ड्रिमलँड सिटी ३, गणेश पेठ १, झाकलवाडी १, साखरा ३, पार्डी आसरा १, अनसिंग १, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील ३, मुठ्ठा २, शिरपूर जैन १०, मंगरूळपीर शहरातील बिरबलनाथ मंदिर परिसर २, जैन मंदिर परिसर १, शेगी ९, रिसोड शहरातील जिजाऊनगर येथील १, देशमुख गल्ली १, गोहगाव हाडे येथील २, एकलासपूर येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसर १, तसेच सोहळ येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.
वाशिम जिल्ह्यात आणखी ३० कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 11:24 IST