शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् चोरट्याने चक्क अकोला आगाराची बस पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 14:24 IST

वाशिम: राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) अकोला येथील अकोला-१ आगाराची बस लंपास करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने १ नोव्हेंबरच्या रात्री केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) अकोला येथील अकोला-१ आगाराची बस लंपास करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने १ नोव्हेंबरच्या रात्री केला. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून ही बस वेगात पळविण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना रस्त्याच्या कडेला उलटल्याने चोरट्याला बस सोडून पळावे लागले. हा प्रकार मंगरुळपीरनजिकच्या गोलवाडी येथे २ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आला.अकोला-२ आगारात रात्री उभी असलेली एमएच-१४, ०६४२ क्रमांकाची बस अज्ञात चोरट्याने चालवत मंगरुळपीर येथे आणली. त्यानंतर ही बस मंगरुळपीरहून वाशिमकडे नेण्याचा त्याचा प्रयत्न होता. दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु असून, यामध्येच मंगरुळपीर-वाशिम मार्गाच्या कामाचा समावेश आहे. या मार्गावर मंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडीनजिक रस्त्याच्या कामासाठी रस्त्याच्या कडेलाच खोदकाम करण्यात आले आहे. याच ठिकाणाहून चोरट्याने वेगाने बस चालवितानाच चुकीच्या मार्गाने समोरच्या वाहनास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला खोल भागात उलटली. त्यामुळे बस सोडून चोरट्याला पळ काढावा लागला. २ नोव्हेंबर रोजी सकाळी मंगरुळपीर आगारात याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर विभागीय नियंत्रकांसह इतर अधिकाऱ्यांनी मंगरुळपीर येथे दाखल होऊन याबाबत चौकशीही केली. दरम्यान, रस्त्याच्याकडेला उलटलेली ही बस राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाºया कंत्राटदार कंपनीच्या कामगारांनीच के्रनच्या आधारे बाहेर काढली. त्यानंतर ही बस मंगरुळपीर आगारात नेण्यात आली. या प्रकरणी संबंधित कर्मचाºयांची विभागीय नियंत्रकांकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविल्याची माहिती मिळाली नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाwashimवाशिमCrime Newsगुन्हेगारीstate transportराज्य परीवहन महामंडळ