लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कारंजा येथील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयात २ आॅक्टोंबरपासून सुरू असलेल्या विद्यापीठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत ३ आॅक्टोबरच्या अंतिम सामन्यात शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला या संघाने बाजी मारली असून, एच एन सिन्हा महाविद्यालय पातूरचा संघ उपविजेता ठरला. दोन दिवसीय अमरावती विद्यापिठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत एकूण १७ संघाने सहभाग नोंदविला होता. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष गवई, विकास समिती सदस्य विजय काळे, प्रा प्रदीप खेडकर, प्रा नंदकिशोर ठाकरे, प्रा दिनेश निकड़े व महाविद्य़ालयीन प्राध्यापकांची उपस्थिती होती. ३ आॅक्टोबर रोजी सेमी फायनल सामना श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा व शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला यांच्यामध्ये झाला. यामध्ये अकोल्याच्या संघाने विजय मिळविला. अंतिम सामना शंकरलाल खडेलवाल महाविद्यालय अकोला व एच एन सिन्हा पातूर यांच्यात रंगला. यामध्ये अकोला संघ विजयी ठरला. विजयी संघाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या दोन दिवशीय सामन्यात महिला वीर म्हणून पातूर येथील अपर्णा भटकर तर बेस्ट कॅचर म्हणून अकोला येथील समीक्षा नितनवरे व तर अंतिम सामन्यात सामना वीर म्हणून खंडेलवाल महाविद्यालयाची किरण जरागे तर बेस्ट रेडर म्हणून कारंजा धाबेकर महाविद्यालयाची कांचन तायडे हिला सन्मानित करण्यात आले. महिला कबड्डी यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे राहूल रडके, प्रा. डॉ. कैलास गायकवाड, प्रा. डॉ. संतोश खंडारे, प्रा. डॉ. अशोक जाधव, प्रा. डॉ. योगेश पोहोकार, गं्रथपाल उमेश कुºहाडे, प्रा. पराग गावंडे, राजू अढाव, उमेश देशमुख, प्रवीण डफडे, बाळकृष्ण खानबरड, राजू राउत, सुनिल राजगुरे, प्रकाश लोखंडे, अरूण ईसळ यांनी सहकार्य केले.
अमरावती विद्यापिठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धा; अकोल्याचा संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 18:30 IST
विद्यापीठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत ३ आॅक्टोबरच्या अंतिम सामन्यात शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला या संघाने बाजी मारली असून, एच एन सिन्हा महाविद्यालय पातूरचा संघ उपविजेता ठरला.
अमरावती विद्यापिठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धा; अकोल्याचा संघ विजयी
ठळक मुद्देदोन दिवसीय अमरावती विद्यापिठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत एकूण १७ संघाने सहभाग नोंदविला होता.अकोला या संघाने बाजी मारली असून, एच एन सिन्हा महाविद्यालय पातूरचा संघ उपविजेता ठरला.