शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाबीज : बीजोत्पादक शेतकऱ्यांना मिळणार फरकाची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 15:33 IST

शासनाने बाजार समित्यातील दरापेक्षा आधारभूत किंमत अधिक असेल, तर त्यामधील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकºयांना देण्याची योजना लागू केली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षी बाजार समित्यात आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी झाली होती. त्यामुळे बियाणे महामंडळासाठी बीजोत्पादन करणाºया शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. या शेतकºयांना फरकाची रक्कम देण्याचा प्रस्ताव महाबीजने सादर केला होता. शासनाने त्या प्रस्तावाला २७ डिसेंबरच्या निर्णयान्वये मंजुरी दिली आहे.राज्यात २०१७-१८ या वर्षात उत्पादित पिकांकरिता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील दर किमान आधारभूत किमतीपेक्षा अर्थात हमीदरापेक्षा कमी होते. त्यामुळे बियाणे महामंडळाच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकºयांना नुकसान सहन करावे लागले होते. त्याचा परिणाम बीजोत्पादन कार्यक्रमावर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळ पुणेच्यावतीने शासनाकडे आधारभूत किमतीचा विचार करून शेतकºयांना फरकाची रक्कम देण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्या प्रस्तावानुसार शासनाने बाजार समित्यातील दरापेक्षा आधारभूत किंमत अधिक असेल, तर त्यामधील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकºयांना देण्याची योजना लागू केली. आता खरीप व रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये उत्पादित शेतमालास बाजार समित्यांत कमी दर मिळाल्याने बीजोत्पादकांना त्याचा फटका बसला. त्यामुळे शासनाच्या योजनेनुसार २०१८-१९ च्या खरीप, रब्बी बीजोत्पादन केलेल्या शेतकºयांना कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर आणि शासन घोषित किमान आधारभूत किमत (एमएसपी) यामधील फरकाची रक्कम देण्यासाठी एकूण १३०२.०३ लाख (१३ कोटी ३ हजार) रकमेच्या अनुदानास मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळ पुणेच्यावतीने शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावास राज्यस्तरीय समितीने ३ डिसेंबर २०१९ रोजीच्या बैठकीत मान्यता दिली. या मान्यतेला अनुसरून शासनाने २७ डिसेंबर रोजीच्या निर्णयान्वये बीजोत्पादकांना फरकाची रक्कम अदा करण्यासाठी १३०२.०३ लाख निधीच्या वितरणास मंजुरी दिली आहे. त्यामुळे गतवर्षी बीजोत्पादन प्रकल्पात सहभागी शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.

 

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीजFarmerशेतकरी