शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अकोला-परभणी बसफेरीला शिरपूर बसस्थानकाची 'अॅलर्जी' !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 14:35 IST

शिरपुर जैन (वाशिम) - अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बसफेरी शिरपूर जैन येथील बस स्थानक परिसरात न आणताच गावाबाहेरूनच वळविण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपुर जैन (वाशिम) - अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बसफेरी शिरपूर जैन येथील बस स्थानक परिसरात न आणताच गावाबाहेरूनच वळविण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. २० वर्षापेक्षा अधिक काळापासून अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बसफेरी शिरपूर , रिसोड मार्गे सुरू आहे. सदर बसफेरी मागील काही दिवसांपासून शिरपूर बस स्थानकावर आणण्यात येत नाही. परस्पर गावाबाहेरून रिसोडमार्गे परभणीकडे नेण्यात येत आहे. त्यामुळे शिरपूरसह परिसरातील जिंतूर, परभणीकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रवाशांना अकोला ते परभणी  बसने प्रवास करणे डोकेदुखी ठरत आहे. अशाप्रकारे जिंतूर ते अकोला बस फेरीसुद्धा काही दिवसापासून गावा बाहेरून वळविण्यात येत आहे. तर ४ डिसेंबर रोजी रिसोड ते अकोला बसफेरी तीन वाजताच्या सुमारास गावाबाहेरूनच नेण्यात आली. अकोला ते रिसोड बसफेरीतून ज्येष्ठ नागरिकांना शिरपूर येथील रिसोड फाट्यावर उतरून देण्यात आले. 

 

 मी ४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता रिसोड येथून रिसोड ते अकोला बसमध्ये शिरपूर पर्यंत प्रवास केला. मात्र वाहक, चालकाने बस शिरपूर बसस्थानकापर्यंत न आणता रिसोड फाट्यावर उतरून दिले.  - पंडितराव देशमुख ज्येष्ठ नागरिक शेलगाव बगाडे.. 

 मी माझ्या कुटुंबासह सेनगाव येथे जाण्यासाठी ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून अकोला ते परभणी बसची शिरपूर बस स्थानकावर वाट पाहत होतो. बस शिरपूर बसस्थानकावर आलीच नाही. बस गावावरूनच गेल्याची माहिती काही वेळाने मिळाली. त्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला.- संदीप तोटेवार, शिरपुर जैन.

टॅग्स :AkolaअकोलाShirpur Jainशिरपूर जैनstate transportराज्य परीवहन महामंडळ