शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
7
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
8
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
9
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
10
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
11
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
12
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
13
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
14
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
15
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
16
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
17
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
18
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
19
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
20
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

कृषी स्वावलंबन योजना : अर्जासाठी दोन दिवसांची मुदत; संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 4:07 PM

ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने शेतकरी लाभार्थींची गोची झाली  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१९-२० या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना ४ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने शेतकरी लाभार्थींची गोची झाली  आहे.अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील शेतकºयांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांसाठी  बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविली जात आहे. या योजनेतून नविन विहीरीकरीता २.५० लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, विद्युत जोडणी व सौर कृषि पंपासाठी १० हजार रुपये, विद्युत पंपसंचसाठी २० हजार रुपये, सुक्ष्म सिंचनाकरीता ९० टक्के मर्यादेत ठिंबक संचासाठी ५० हजार रुपये व तुषार संचासाठी २५ हजार रुपये पूरक अनुदान, शेततळ्याच्या अस्तरीकरणसाठी १ लाख रुपये इत्यादी विविध बाबींसाठी अनुदान मर्यादेत पॅकेज स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या अनुसूचित जातीचे शेतकरी तसेच वनपट्टेधारक आदीवासी शेतकरी, दिव्यांग व महिला शेतकºयांची प्राधान्याने निवड करण्यात येईल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा ४ सप्टेंबर २०१९ पर्यंत उपलब्ध राहणार आहे. परंतू, जिल्ह्यात ९ आॅगस्टपासून ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन, त्यानंतर २२ आॅगस्टपासून ग्रामसेवक बेमुदत कामबंद आंदोलनावर आहे. परिणामी, ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने पात्र शेतकरी लाभार्थींना अर्ज सादर करणे अशक्य झाले आहे. या योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहू नये म्हणून अर्जासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना