०००००
कार्ली परिसरात विजेचा लपंडाव
वाशिम : कार्ली परिसरातील गावांमध्ये विद्युत पुरवठा अधून-मधून खंडित होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
०००००
रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित
वाशिम : रोजगार हमी योजनेत कार्यरत ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. मानधनात वाढ नाही तसेच दरमहा पहिल्या आठवड्यात मानधनही मिळत नाही. एका महिन्याचे मानधन प्रलंबित आहे.
०००००
रिक्त पदे भरण्याची मागणी
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तुलनेने अपुरे मनुष्यबळ आहे. यामुळे कामकाज वारंवार प्रभावित होऊन नागरिकांची गैरसोय होत आहे. रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी अमोल वानखडे यांनी बुधवारी केली.
०००
नव्या बॅरेजेसच्या मंजुरीची प्रतीक्षा
वाशिम : जिल्ह्यातील अडाण नदीवर बॅरेज निर्मितीचा प्रस्ताव आहे. या बॅरेजला सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. मंजुरी केव्हा मिळणार, याकडे लक्ष आहे.
००००००००
मास्कच्या विक्रीत कमालीची घट
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने मास्कच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. सॅनिटायझरचा वापरही घटला आहे.
००००
जिल्हा परिषदेत थर्मल गनने तपासणी
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट कमी झाले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य प्रवेशद्वाराजवळ नागरिकाची थर्मल गनद्वारे तपासणी केली जात आहे. ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची थर्मल गनद्वारे तपासणी केली जाते. यामुळे सुरक्षितता बाळगणे शक्य होत आहे.