शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषद अभियंत्यांचे सामुहिक रजा आंदोलन; कामकाज ठप्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 16:07 IST

वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जिल्हा परिषद अभियंता संघटनेने १५ मार्च रोजी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर, १९ मार्चपासून दोन दिवशीय सामुहिक रजा आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर आंदोलन केले जात आहे.

वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जिल्हा परिषद अभियंता संघटनेने १५ मार्च रोजी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर, १९ मार्चपासून दोन दिवशीय सामुहिक रजा आंदोलन पुकारले आहे. १९ मार्च रोजी वाशिम जिल्हा परिषदेचे अभियंते सामुहिक रजा आंदोलनावर असल्याने कामकाज ठप्प झाले. 

जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांतर्फे १५ मार्च रोजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले होते. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे १९ व २० मार्च रोजी अभियंत्यांचे सामुहिक रजा आंदोलन आहे. जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र या नोंदणीकृत संघटनेस शासन मान्यता देणे, जि.प. अभियंत्यांना प्रवासभत्त्यापोटी दरमहा किमान १० हजार रुपये मासिक वेतनासोबत अदा करणे, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन उपविभाग तत्काळ निर्माण करणे, जिल्हा परिषदेकडील अभियंता सवंर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा देण्याचा दिनांक व त्या बाबत करावयाची वेतन निश्चिती, जलसंपदा विभागाकडील ६ डिसेंबर २०१४ रोजीच्या निर्णयाप्रमाणे करण्याबाबत ग्रामविकास विभागाने आदेश निर्गमित करावा, जिल्हा परिषदेकडील कनिष्ठ अभियंता संवर्गातील व स्थापत्या अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदे विशेष बाब म्हणून तत्काळ भरण्यात यावी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता पदावर जिल्हा परिषदेतील अभियंत्यांना द्यावयाच्या पदोन्नतीचा कोटा मंजूर पदांच्या प्रमाणात पुनर्विलोकीत करण्यात यावा, जिल्हा परिषदेच्या अभियंता संवर्गास अतांत्रिक कामे न देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात यावा, जि.प. अभियंता संवर्गासाठी जीवनदायी आरोग्य विमा योजना लागू करण्यात यावी, जि.प. कनिष्ठ अभियंत्यांना व्यावसायिक परीक्षेबद्दल लागू केलेले २१ एप्रिल २००६ चे परिपत्रक रद्द करण्यात यावे, आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर आंदोलन केले जात आहे, अशी माहिती संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष विश्वास घुगे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमzpजिल्हा परिषद