शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केनवड येथे रास्ता रोको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 17:32 IST

शेतकºयांनी ९ सप्टेंबर रोजी मालेगाव ते मेहकर मार्गावरील केनवड येथे रास्ता रोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केनवड परिसरातील अनेक शेतकºयांना कर्जमाफी, पीक कर्ज पुनर्गठणाचा  लाभ मिळाला नसल्याने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी ९ सप्टेंबर रोजी मालेगाव ते मेहकर मार्गावरील केनवड येथे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. शेतकºयांसाठी दोन वर्षांपूर्वी पीककर्ज माफीची घोषणा झालेली आहे. केनवड परिसरातील अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा केनवडच्या लाभार्थी शेतकºयांना कर्जमाफीची प्रतिक्षा कायम आहे. शेकडो खातेधारक शेतकºयांनी या शाखेमधून पीक कर्ज, शेती विषयक तसेच वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठी खाते काढले आहेत. शासनाने दिलेल्या कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थी असुन सुद्धा अनेकांचे खाते ‘निल’ दाखवित नाहीत. तालुका उपनिबंधक कार्यालय यादी व बँक स्टेटमेंट यामध्ये तफावत असणे,  अनुदान रक्कम, बचत रक्कम असलेली खाते गोठवणे, परस्पर इंशुरन्स कापणे, शेतकºयांचे संमती शिवाय कर्जाचे पुनर्गठण आदीसंदर्भात सविस्तर चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघर्ष संघटनेने २० आॅगस्ट रोजी केली होती. मात्र, न्याय न मिळाल्याने ९ सप्टेंबर रोजी संघटनेचे अध्यक्ष राजू वानखेडे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष गणेश अढाव यांच्या नेतृत्वात केनवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पात्र शेतकºयांना कर्जमाफी, कर्ज पुनर्गठणाचा लाभ मिळालाच पाहिजेत, शेतकºयांचे संमती शिवाय कर्जाचे पुनर्गठण याप्रकरणी संबंधितांविरूद्ध कारवाई करून शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी केली.दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत पीककर्जाबाबत तक्रार असलेल्या शेतकºयांच्या प्रकरणाची वैयक्तिक चौकशी करणार असून, यासाठी ९ सप्टेंबरपासून केनवड शाखेत विशेष अधिकारी नियुक्ती करण्याचे लेखी आश्वासन एसबीआयच्या क्षेत्रीय प्रबंधकांनी दिले. यामुळे दुपारी २ वाजतादरम्यान रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामुळे सकाळी ११ ते २ वाजतादरम्यान मेहकर ते मालेगाव या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली होती.

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी