शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी - शैलेश हिंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 18:40 IST

निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत. सोयाबिन, तूर, उडिद, कपाशी या पारंपरिक पिकांसह फुल व फळपिके नेस्तनाबूत झाली. या अस्मानी, सुलतानी संकटप्रसंगी शेतकºयांना प्रशासनाच्या भरीव सहकार्याची अपेक्षा आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन शेतकºयांच्या पाठिशी असून पीक नुकसानाचे पंचनामे चोखपणे पार पाडून शेतकºयांना नियमानुसार मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी संकटात सापडले, याबाबत प्रशासनाच्या भुमिकेविषयी काय सांगाल? अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या निर्देशावरून २७ आॅक्टोबरपासूनच पिक नुकसानाचे पंचनामे करण्याची प्रक्रिया अवलंबिण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकाºयांनाही शेतकºयांच्या बांधापर्यंत पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे कृषी अधिकारी कार्यालय व बँकांमध्ये शेतकºयांचे तक्रार अर्ज स्विकारण्यात आले असून शासकीय नियमानुसार शेतकºयांना मदत पुरविली जाणार आहे.

पीक विमा घेतलेल्या शेतकºयांनाच मिळणार का नुकसानभरपाई ?चालूवर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ३० हजार ७५६ कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांनी पिकांचा विमा उतरविला आहे. २ नोव्हेंबरपर्यंत १ लाख ७ हजार ९६१ शेतकºयांनी पीक विम्यापोटी नुकसानभरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण, पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण करून तसे अहवाल शासनाकडे पाठविले जाणार आहेत. पीक विमा घेतलेले नव्हे; तर नुकसानग्रस्त सर्व शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे केले जात आहेत. 

सर्वेक्षण आणि पंचनामे करताना पावसामुळे अडचण जात आहे काय?जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये अवकाळी पावसाने पिकांची प्रचंड हानी झाली आहे. अनेक ठिकाणी सोंगल्यानंतर सुड्या रचून ठेवलेल्या सोयाबिनला कोंब फुटले असून काहीठिकाणी उभी असलेली ज्वारी आणि कपाशी या पिकांचीही अशीच गंभीर अवस्था झालेली आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा चिखल तुडवत तथा पाऊस सुरू असतानाही पंचनामे करित आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती