शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

शौचालय न उभारणाऱ्या लाभार्थींवर होणार कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 2:48 PM

अनुदान देण्यात आले; मात्र तब्बल ८५७ लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्रशासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वाशिम नगर परिषदेकडून वैयक्तिक स्वरूपात शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी लाभार्थ्यांना वर्षभरापूर्वी अनुदान देण्यात आले; मात्र तब्बल ८५७ लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले नाही. दरम्यान, येत्या २८ जूनपर्यंत काम पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करावा अथवा घेतलेले अनुदान परत करावे; अन्यथा पोलिसांत फौजदारी दाखल करण्यात येईल, असा इशारा वाशिम नगर परिषदेने संबंधित लाभार्थ्यांना नोटीसव्दारे दिला आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत ज्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांना ते उभारण्याकरिता केंद्र शासनाकडून १२ हजार आणि नगर परिषदेकडून ५ हजार असे एकंदरित १७ हजारांचे अनुदान देण्यात येते. दरम्यान, वाशिम नगर परिषदेकडून घरांचा सर्वे करून प्राप्त अर्जांप्रमाणे लाभार्थ्यांना वर्षभरापूर्वी शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी अनुदान देण्यात आले; मात्र ८५७ लाभार्थ्यांनी अनुदान घेवूनही शौचालयांची कामे पूर्ण केली नसल्याचे नगर परिषदेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अखेर नगर परिषदेने संबंधित सर्व लाभार्थ्यांना लेखी स्वरूपात नोटीस पाठविल्या आहेत. त्यात नमूद केले आहे, की केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपणास वाशिम नगर परिषदेकडून शासकीय अनुदान देण्यात आले; परंतु आपण अद्यापपर्यंत शौचालयाचे बांधकाम सुरू केलेले नाही. ते तत्काळ करून येत्या २८ जूनपर्यंत नगर परिषदेस कळविण्यात यावे. दिलेल्या मुदतीत शौचालयाचे बांधकाम पूर्ण न केल्यास नगर परिषदेकडून देण्यात आलेले अनुदान परत करावे; अन्यथा केंद्र शासनाच्या निधीचा दुरूपयोग करणे तथा शासनाची दिशाभूल करून शासकीय अनुदानाचा अपहार केला आहे, असे गृहित धरून भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतुदीनुसार वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फौजदारी दाखल करण्यात येईल, असा इशारा नगर परिषदेकडून देण्यात आला आहे. तथापि, प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अनुदान घेवूनही शौचालयाचे बांधकाम पूर्ण न करणाºया लाभार्थींमध्ये घबराट पसरल्याचे दिसून येत आहे.वाशिम शहरातील ज्या कुटूंबांकडे शौचालय नाही, अशांचे सर्वेक्षण करून संबंधितांना स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त निधी वितरित करण्यात आला. या कुटूंबांनी प्राधान्याने शौचालयांचे बांधकाम पूर्ण करून तशी माहिती नगर परिषदेला कळवायला हवी होती; मात्र वर्ष उलटूनही संबंधित लाभार्थींनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच अखेर नगर परिषदेला आक्रमक पवित्रा घ्यावा लागला.- वसंत इंगोले, मुख्याधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका