शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील सरकारी शाळा वाचविण्यासाठी कृती आराखडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 17:54 IST

शाळा बचाव समिती स्थापन : मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : विद्यार्थी संख्या कमी होत ...

शाळा बचाव समिती स्थापन : मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांसमोर आव्हानात्मक परिस्थिती उभी ठाकली आहे. या सरकारी शाळा वाचविण्यासाठी शिक्षणप्रेमी, सामाजिक संघटनांनी कृती आराखडा आखला असून, २१ जुलै रोजी स्थानिक  रेखाताई राष्ट्रीय विद्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्याच्या अनुषंगाने २१ जुलै रोजी आयोजित बैठकीला शिक्षणप्रेमी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षकांची उपस्थिती होती. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक कस्तुरीरंगन समितीने ३१ मे २०१९ रोजी भारत सरकारला सादर केले. या धोरणावर विविध संघटना व विचारप्रवाहात मंथन सुरू असून, या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाच्या बाजारीकरणाला, स्तरीकरणाला व स्त्रियांच्या दुय्यमत्त्वाला बळकटी मिळेल, असा सूर यावेळी निघाला. वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वधर्मसमभाव, लोकशाही मूल्य, स्त्री-पुरूष समानता, आधुनिक विचारसरणी या विशेष महत्त्व न देता पारंपारिक मुल्य व विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार या नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आल्याचेही यावेळी मान्यवरांनी सांगितले. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद शाळा व इतर मराठी शाळांची सद्यस्थितीत दैनावस्था झाली आहे. काही शाळांचा अपवाद वगळता बहुतांश शाळांमध्ये पुरेशा भौतिक सुविधा नसणे, पुरेसे शैक्षणिक वातावरण नसल्याने तसेच पालकांमध्ये या शाळांबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाल्याने   शाळांची पटसंख्या कमी होत आहे. परिणामी जिल्ह्यातील चार गावांमधील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर काही गावातील शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थी संख्येअभावी सरकारी शाळा बंद होऊ नये म्हणून यावेळी सर्वांनी जनजागृती करून पालकांचे मन वळविण्याचे कार्य हाती घ्यावे, यावर एकमत झाले. बैठकीला शिक्षणप्रेमी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा