शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 18:06 IST

Accused of murdering wife sentenced to life imprisonment : मुलीच होतात या कारणावरून धनंजय हा नेहमी पत्नीस मारहाण करीत होता.

वाशिम : पत्नीचा खून करणाºया भापूर (ता.रिसोड) येथील पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम. मेनजोगे यांनी ८ डिसेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धनंजय प्रल्हाद बोडखे (३०) असे आरोपीचे नाव आहे.शिरपूर येथील जगन्नाथ भिवाजी काटोळे यांच्या मुलीची विवाह धनंजय बोडखे रा.भापूर याच्याशी झाला होता. मुलीच होतात या कारणावरून धनंजय हा नेहमी पत्नीस मारहाण करीत होता. याच कारणावरून त्याने २४ मे २०१८ रोजी पत्नीच्या गळ्याला दोराने आवळून जिवाने मारून टाकले आणि गळफास घेतला, असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जगन्नाथ काटोळे यांच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी आरोपी धनंजय बोडखे याच्याविरूद्ध भादंवी कलम ३०२, ४९८ अ नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक बाबुसिंग राठोड व पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे यांनी प्राथमिक तपास केला तर पोलीस निरीक्षक हरिष गवळी यांनी मुख्य तपास केला. पोलीस निरीक्षक नाईकनवरे यांनी प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाचे तपास सहाय्यक म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाईकराव यांनी काम पाहिले. साक्षी पुरावे तपासून विद्यमान न्यायाधीश एस.एम. मेनजोगे यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारच्यावतीने अ‍ॅड. व्यवहारे यांनी कामकाज पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून भिमराव गवई व ममता इंगोले यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.  

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी