लोकमत न्यूज नेटवर्कलोणी बु. (वाशिम) : दुचाकी आणि स्कुटीची धडक होऊन घडलेल्या अपघातात एक जण ठार झाला. ही घटना रिसोड तालुक्यातील लोणी बु. ते रिसोड मार्गावर लोणीपासून एक किलोमीटर अंतरावर घडली. सखवा हिवरकर, असे मृतकाचे नाव असून, तो हिंगोली जिल्ह्यातील खंबाळा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार साबण विक्रीचा व्यवसाय करणारे सखवा हिवरकर ते एमएच-३८, सी. ०८०१ क्रमांकाच्या दुचाकीने लोणी बु. येथून रिसोडकडे जात होता. लोणीपासून एक किलोमीटर अंतरावर विरुद्ध दिशेने येणारी स्कुटीला या दुचाकीची धडक लागली. या अपघातात सखवा हिवरकर दुचाकीवरून गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर स्कूटीचालक पंढरी सानप यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी रिसोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दुचाकिंची समोरासमोर धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 14:51 IST
लोणी बु. (वाशिम) : दुचाकी आणि स्कुटीची धडक होऊन घडलेल्या अपघातात एक जण ठार झाला.
दुचाकिंची समोरासमोर धडक; एक ठार
ठळक मुद्दे ही घटना रिसोड तालुक्यातील लोणी बु. ते रिसोड मार्गावर लोणीपासून एक किलोमीटर अंतरावर घडली.सखवा हिवरकर, असे मृतकाचे नाव असून, तो हिंगोली जिल्ह्यातील खंबाळा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.