शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड-मेहकर मार्गावर काळी-पिवळी उलटली;  एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 17:29 IST

 रिसोड - खासगी प्रवासी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. यामध्ये रमेश मोतीराम देशमाने (६२) रा. वाकद हे जागीच ठार झाले. ही घटना रिसोड ते मेहकर मार्गावरील मोठेगाव गावानजीक सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. 

ठळक मुद्देही घटना रिसोड ते मेहकर मार्गावरील मोठेगाव गावानजीक सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. मोठेगाव गावाजवळ समोरून येणाºया मोटारसायकलमुळे खासगी प्रवासी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.सदर वाहन दोन ते तीन वेळा उलटल्याने यामध्ये रमेश देशमाने हे दबल्या गेले.

 रिसोड - खासगी प्रवासी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. यामध्ये रमेश मोतीराम देशमाने (६२) रा. वाकद हे जागीच ठार झाले. ही घटना रिसोड ते मेहकर मार्गावरील मोठेगाव गावानजीक सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. एमएच २८ एच १७३४ क्रमांकाच्या खासगी प्रवासी (काळी पिवळी) वाहनाने चार ते पाच प्रवासी रिसोडवरून मेहकरकडे जात होते. दरम्यान, मोठेगाव गावाजवळ समोरून येणाºया मोटारसायकलमुळे खासगी प्रवासी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. सदर वाहन दोन ते तीन वेळा उलटल्याने यामध्ये रमेश देशमाने हे दबल्या गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अन्य प्रवाशांनादेखील किरकोळ मार लागला.  घटनेची माहिती मिळताच रस्त्यावरील नागरिकांनी अपघातग्रस्त वाहन सरळ केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून रमेश देशमाने यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी देशमाने यांना मृत घोषित केले. मृतक रमेश देशमाने यांच्या मुलाचा २८ जानेवारीलाच साखरपुडा झाला होता. अपघाती निधनाने देशमाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या अपघातप्रकरणी पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात