लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून घडलेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना, अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर मेडशीपासून जवळच असलेल्या तलाववाडीच्या वळणावर ३१ जुलै रोजी घडली होती. यातील एका गंभीर जखमीचा बुधवार १ आॅगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैलास नामदेव जटाळे (४५) रा. धमधमी, असे मृतकाचे नाव आहे. अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील मेडशीपासून जवळच असलेल्या तलाववाडीच्या वळणावर एमएच ३७, एन ८९४५ क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना ३१ जुलै रोजी घडली होती. या अपघातात दुचाकीवरील किसन लक्ष्मण कदम आणि कैलास नामदेव जटाळे रा. धमधमी, ता. मालेगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. ही माहिती मिळाल्यानंतर मालेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावून दोन्ही जखमींना अकोला येथे उपचारासाठी हलविले. या दोघांवर अकोला येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच कैलास नामदेव जटाळे याचा १ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. दरम्यान, किसन लक्ष्मण कदम, याचीही प्रकृती गंभीरच असून, त्याच्यावर अकोला येथेच खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
दुचाकी अपघातामधील गंभीर जखमीचा मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:08 IST
एका गंभीर जखमीचा बुधवार १ आॅगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैलास नामदेव जटाळे (४५) रा. धमधमी, असे मृतकाचे नाव आहे.
दुचाकी अपघातामधील गंभीर जखमीचा मृत्यू !
ठळक मुद्दे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून घडलेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी. मेडशीपासून जवळच असलेल्या तलाववाडीच्या वळणावर ३१ जुलै रोजी घडली होती. कैलास नामदेव जटाळे याचा १ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. किसन लक्ष्मण कदम, याचीही प्रकृती गंभीरच.