लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: मानोरा तालुक्यातील बंजारा काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पोहरादेवी येथून दर्शन घेऊन परत गावी जात असलेल्या भाविकांचे वाहन उलटल्याने १५ जणांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना २२ आॅक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलिसांच्या हद्दीत भडकूंभा फाट्यानजिक घडली. सर्व जखमींना वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. माहितीनुसार, एमएच-२१, २८७ क्रमांकाचे पीकअप वाहन पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना घेऊन शेंदूरजना आढाव मार्गे परत येत होते. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या भडकूंभा फाट्यानजिक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन उलटले. या अपघातात वाहनात बसलेल्या भाविकांपैकी १५ जणांना दुखापत झाली. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच आसेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत सर्व जखमींना उपचारासाठी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.
दर्शन घेऊन परतणा-या भाविकांच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:38 IST
मंगरुळपीर: मानोरा तालुक्यातील बंजारा काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पोहरादेवी येथून दर्शन घेऊन परत गावी जात असलेल्या भाविकांचे वाहन उलटल्याने १५ जणांना किरकोळ दुखापत झाली.
दर्शन घेऊन परतणा-या भाविकांच्या वाहनाला अपघात
ठळक मुद्दे१५ जणांना दुखापतमंगरुळपीर तालुक्यातील भडकूंभा फाट्यानजिकची घटना