शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमुळे मुलगा अडकला इंदूरला; मुलीने वडिलांना दिला अग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 17:08 IST

एकुलता एक मुलगा लॉकडाउनमुळे इंदूर येथून येऊ न शकल्याने लहान मुलगी रिमा हीने वडीलांना मुखाग्नी दिला. 

- प्रफुल बानगावकरकारंजा लाड (वाशिम) : कारंजा नगर परिषदेचे शिपाई ज्ञानेश्वर जाधव यांचा १५ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू झाला. वडिलांच्या अत्यसंस्कारासाठी एकुलता एक मुलगा लॉकडाउनमुळे इंदूर येथून येऊ न शकल्याने लहान मुलगी रिमा हीने वडीलांना मुखाग्नी दिला. कोरोना विषाणू ससंर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहिर केला. लॉकडाउनमुळे कोणत्या नातेवाईकाकडे किंवा कुटूंबातील कुणाचे निधन झाले तरी येता-जाता येत नाही अशी स्थिती आहे. कारंजा नगर परिषदचे शिपाई ज्ञानेश्वर गणपतराव जाधव यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने १५ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांना अक्षय नावाचा एकुलता एक मुलगा व दोन मुली आहेत. कामानिमित्त अक्षय हा इंदूर (मध्य प्रदेश) येथे असल्याने वडीलांच्या अंत्यसंस्कारासाठी येण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, लॉकडाउनमुळे त्याला कारंजा येथे येणे शक्य झाले नाही. शेवटी लहान मुलगी रिमा हीने वडीलांला मुखाग्नी दिला. मुलगा हा वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी येऊ शकला नसल्याने किमान दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी २४ एप्रिल रोजी त्याला कारंजा येथे येण्यासाठी रितसर परवानगी द्यावी अशी विनंती व मागणी मृतक जाधव यांच्या पत्नी व दोन मुलींनी कारंजाचे तहसिलदार धीरज मांजरे यांच्याकडे केली. शिंदे कुटुंबियाच्यावतीने शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश बाबरे यांनीदेखील तहसिलदार व कारंजा पोलीस स्टेशनकडे अर्ज करून मृतकाच्या मुलाला कारंजा येथे येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक