शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ात ९५ अप्रशिक्षित शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:23 IST

वाशिम: शिक्षण शास्त्रातील कोणतीही पदविका किंवा  पदवी नसतानाही जिल्हय़ातील ९५ प्रशिक्षित शिक्षक  अध्यापनाचे कार्य करीत असल्याचे समोर आले आहे.  या शिक्षकांना ३१ मार्च २0१९ पूर्वी शिक्षण शास्त्रातील  पदविका किंवा पदवी प्राप्त करावी लागणार असून,  शिक्षण शास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी १५  सप्टेंबर २0१७ ही अंतिम मुदत आहे. 

ठळक मुद्देप्रशिक्षित होण्याची शेवटची संधीअर्जासाठी १५ सप्टेंबर शेवटची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शिक्षण शास्त्रातील कोणतीही पदविका किंवा  पदवी नसतानाही जिल्हय़ातील ९५ प्रशिक्षित शिक्षक  अध्यापनाचे कार्य करीत असल्याचे समोर आले आहे.  या शिक्षकांना ३१ मार्च २0१९ पूर्वी शिक्षण शास्त्रातील  पदविका किंवा पदवी प्राप्त करावी लागणार असून,  शिक्षण शास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी १५  सप्टेंबर २0१७ ही अंतिम मुदत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे शिक्षक हे शिक्षण  शास्त्रातील पदविका किंवा पदधीधारक असणे  बंधनकारक आहे. तथापि, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  शाळेसह खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळेमध्ये  सक्षम प्राधिकार्‍यांनी यापूर्वी पदवीधर किंवा अन्य  शैक्षणिक पात्रता धारण करणार्‍या उमेदवारांना शिक्षक  म्हणून मान्यता दिली. जिल्हय़ात एकूण ९५ अप्रशिक्षित  प्राथमिक शिक्षक आहेत. शिक्षण शास्त्रातील डी.टी.एड.  किंवा बी.एड. ही  अनुक्रमे पदविका व पदवी नसतानाही  प्राथमिक शिक्षक म्हणून वैयक्तिक मान्यता प्रदान  केलेल्या या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना राज्य  शासनाच्या पत्राद्वारे प्रशिक्षण योजनेमध्ये अथवा नॅशनल  इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूल योजनेंतर्गत शिक्षण  शास्त्रातील पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार  आहे. बालकांचा मोफत व  सक्तीचा अधिकार  अधिनियम २00९ मधील कलम २३ (२) मध्ये  शाळांमधील अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित  करण्यासाठी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.  सर्व व्यवस्थापनाच्या कायम विना अनुदानित, स्वयं अ र्थसहाय्यित शाळांमधील प्राथमिक अप्रशिक्षित  शिक्षकांनादेखील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूल  योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर १५ स प्टेंबर २0१७ पर्यंत शिक्षण शास्त्रातील पदविका किंवा  पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करता येणार आहे.  कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च २0१९ पूर्वी शिक्षण  शास्त्रातील पदविका प्राप्त करणे बंधनकारक आहे.  यासाठी १५ सप्टेंबरपूर्वी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे  आवश्यक आहे. ३१ मार्च २0१९ पूर्वी अप्रशिक्षित  शिक्षकांनी प्रशिक्षित व्हावे, त्यासाठी १५ सप्टेंबरपूर्वी  प्रवेशासाठी अर्ज भरावे, असे आवाहन जि.प.चे प्रा थमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी केले.