वाशिम : जिल्ह्यात सन २0१५ मध्ये राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आज शहरी भागातील सरासरी ८४.१७ टक्के बालकांना तर ग्रामीण भागातील ९0 टक्क्यांपेक्षा अधिक बालकांना पोलिओची लस देण्यात आली. ग्रामीण भागात दुपारपर्यंंतच जवळपास ८0 टक्के बालकांना पोलिओ लस देण्यात आली होती, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शहरी भागातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन वाशिमचे आमदार लखन मलिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष लताताई उलेमाले, उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. व्ही. डी. क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. एस. सिसोदिया, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. ए. ए. कावरखे, डॉ. अभय पाटील, डॉ. सतीश पाटील, डॉ. कासम तसेच एस. एम. बेंद्रे, एच. व्ही. कांबळे, ए.के. झोड, एस. आर. देवकर, अनिता साबळे, एम. जी. नावकार आदी उपस्थित होते. वाशिम, कारंजा, रिसोड व मंगरूळपीर या शहरांमध्येही पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या ठिकाणी बुथ, फिरती पथके तैनात करून 0 ते ५ वयोगटातील जास्तीत जास्त बालकांना पोलिओ लस देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे यांनी दिली. वाशिम शहरात ९ हजार ५४७, कारंजा शहरात ९ हजार ९३४, रिसोड शहरात ५ हजार २६0 व मंगरूळपीर शहरात ५ हजार २६७ बालकांना पोलिओची लस देण्यात आली. उर्वरित बालकांना दि. २0 ते २४ जानेवारी २0१५ दरम्यान घरोघरी जाऊन लस देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. मेंढे यांनी केले.
८४ टक्के बालकांना पोलिओचा डोस
By admin | Updated: January 19, 2015 02:31 IST