शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 15:37 IST

वाशिम : जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा असून, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाºया एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात ९८ टक्के जलसाठा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील एकूण १३४ प्रकल्पांत सरासरी ८३ टक्के जलसाठा असून, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाºया एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात ९८ टक्के जलसाठा आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ११ आॅक्टोबरअखेर जिल्ह्यातील प्रकल्पांत बºयापैकी जलसाठा असल्याने रब्बी हंगामात सिंचन होण्याच्या शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एकबुर्जी, सोनल, अडाण अशा तीन मध्यम प्रकल्पात सरासरी ९५ टक्के जलसाठा आहे. वाशिम तालुक्यातील एकूण ३५ लघु प्रकल्पांत सरासरी ८९ टक्के जलसाठा आहे. सात प्रकल्पाचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व प्रकल्प पाण्याने तुडूंब आहेत. मालेगाव तालुक्यातील २३ प्रकल्पांत सरासरी ७५ टक्के जलसाठा आहे. मसला खुर्द, सोमठाणा, सोनखास, सुकांडा, खडकी, अडोळ, धारपिंप्री, कुत्तरडोह, मैराळडोह, कोल्ही या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे. रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के जलसाठा आहे. हराळ, वरूड बॅरेज, वाडी रायताळ, वाकद, कुकसा या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे. मोरगव्हाण या प्रकल्पात केवळ ३ टक्के जलसाठा आहे. जवळा प्रकल्पात ३२, मांडवा प्रकल्पात २६, वाघी प्रकल्पात ४० टक्के जलसाठा आहे.मंगरूळपीर तालुक्यातील १६ प्रकल्पांत सरासरी ८१ टक्के जलसाठा आहे. दस्तापूर, जोगलदरी, चौरद, कासोळा या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे. स्वाशिन या प्रकल्पात केवह तीन टक्के, कवठळ ५४, चांदई ६० टक्के तर उर्वरीत प्रकल्पांत ९३ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे.मानोरा तालुक्यातील २३ प्रकल्पांत सरासरी ९२ टक्के जलसाठा आहे. हिवरा बु., वाठोद, रूई, रोहणा, रतनवाडी, कार्ली, गिरोली, फुलउमरी, धानोरा भुसे आदी प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे.कारंजा तालुक्यातील १६ प्रकल्पांत सरासरी ७२ टक्के जलसाठा आहे. हिवरा लाहे, मोखेड पिंप्री, बेलमंडळ, बग्गी, झोडगा, उंद्री, वडगाव, किनखेड या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे. तर गायवळ प्रकल्पात ७ टक्के, ऋषी प्रकल्पात १७ टक्के, धामणी प्रकल्पात ९ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरणWaterपाणी