शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

वाशिम जिल्ह्यात वयाची ‘सेंच्यूरी’ पूर्ण करणारे ७८० मतदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:08 IST

वाशिम : जिल्ह्यातील वाशिम, कारंजा आणि रिसोड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या एकंदरित ९ लाख ४८ हजार ११० मतदारांपैकी ७८० मतदारांनी वयाची ‘सेंच्यूरी’ पूर्ण केलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील वाशिम, कारंजा आणि रिसोड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या एकंदरित ९ लाख ४८ हजार ११० मतदारांपैकी ७८० मतदारांनी वयाची ‘सेंच्यूरी’ पूर्ण केलेली आहे. यासह तब्बल ८९ हजार ९७८ मतदार साठीपार असून ३० ते ३९ वयोगटात सर्वाधिक अर्थात २ लाख १६ हजार ३७१ मतदार आहेत. नव्याने नोंदणी झालेले १८ ते १९ वयोगटातील १८ हजार ४३८ नवमतदारांची भुमिका यंदा निर्णायक राहणार आहे.येत्या ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभुमिवर राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी मतदार नोंदणी मोहिम युद्धस्तरावर राबविली. मतदानाचा टक्का वाढण्यासह नवमतदारांचा मतदान प्रक्रियेत प्रामुख्याने समावेश व्हावा, यासाठी देखील सर्वंकष प्रयत्न करण्यात आले. महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळी प्रवेश अर्जावर मतदान जागृतीविषयक संदेश प्रसारीत करण्यात आला.त्याची फलनिष्पत्ती होवून वाशिम, रिसोड आणि कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा १८ हजार ४३८ मतदारांची नव्याने भर पडली आहे. त्यात रिसोड विधानसभा मतदारसंघात ६ हजार १७७, वाशिम मतदारसंघात ६ हजार ७२२ आणि कारंजा मतदारसंघात ५ हजार ५३९ नवमतदारांचा समावेश आहे.यासह २० ते २९ वर्षे वयोगटात १ लाख ९७ हजार ५९६ मतदार असून ३० ते ३९ वर्षे वयोगटात २ लाख १६ हजार ३७१, ४० ते ४९ वर्षे वयोगटात १ लाख ९३ हजार ८१८, ५० ते ५९ वर्षे वयोगटात १ लाख ४५ हजार ६३४, ६० ते ६९ वर्षे वयोगटात ८९ हजार ९७८, ७० ते ७९ वयोगटात ५२ हजार ६५६, ८० ते ८९ वर्षे वयोगटात २७ हजार ११४, ९० ते ९९ वर्षे वयोगटात ५ हजार २७५; तर १०० पेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या ७८० आहे.या सर्व मतदारांनी यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे.

३० ते ३९ सर्वाधिकजिल्ह्यातील वाशिम, कारंजा आणि रिसोड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या३० ते ३९ वयोगटातील २ लाख १६ हजार ३७१ मतदार सर्वाधिक आहेत. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात ६९१७६, वाशिम ६९९२६ तर कारंजा मतदारसंघात ६७६३३ चा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक