शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुजलाम्, सुफलाम् अंतर्गत ६५ हजार घनमीटरची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 12:54 IST

वाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम्, सुफलाम् अभियानांतर्गत गत आठवड्यापर्यंतच ६४७३८.६७ घनमीटर आकाराची जलसंधारण कामे करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम्, सुफलाम् अभियानांतर्गत गत आठवड्यापर्यंतच ६४७३८.६७ घनमीटर आकाराची जलसंधारण कामे करण्यात आली आहेत. अद्याप कामे पूर्णत्वास गेली नसली तरी, या कामांमुळे कोट्यवधी लीटरच्या जलसाठ्याची सोय होणार आहे. राज्य शासन आणि भारतीय जैन संघटना (बीजेएस)च्या सामंजस्य करारातून जिल्ह्यात सीसीटी, डीप सीसीटी, साठवण तळे, वनतळे, नाला खोलीकरण आदि जलसंधारणाची शेकडो कामे करण्यात येत आहेत. कृषी विभाग, जलसंधारण विभाग, जि.प. लघू सिंचन विभाग, वनविभागाच्यावतीने ही कामे करण्यात येत आहेत. यातील ४६ साठवण तळ्यांपैकी मंगरुळपीर येथील चांभई आणि पिंपळखुटा, मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर, वाशिम तालुक्यातील चिखली आणि मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील साठवण तळ्यांचे काम वेगात सुरू आहे. वाशिम तालुक्यातील शंभर चौरस मीटर लांबी, रुंदीच्या साठवण तळ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तालुक्यातील कामांचा विचार करता वाशिम तालुक्यात डीप सीसीटी आणि साठवण तळे मिळून  ३१२९२.७२ घनमीटर, कारंजा तालुक्यात सीसीटी, डीप सीसीटी मिळून १६७७५ घनमीटर, मालेगाव तालुक्यात साठवण तळे, नाला खोलीकरण आणि डीप सीसीटी मिळून १५६०० घनममीटर, मानोरा तालुक्यात साठवण तळे आणि डीपसीसीटी मिळून ९९७३, तर मंगरुळपीर तालुक्यात नाला खोलीकरण आणि साठवण तळे मिळून ३३५० घनमीटरची कामे झाली आहेत. वाशिम तालुका आघाडीवर वाशिम तालुक्यात सुजलाम्, सुफलाम अभियानांतर्गत जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. यात कृषी विभागामार्फत चिखली येथे सुरु असलेल्या साठवण तळ्याचे काम गत आठवड्यातच १८१५३ घनमीटर झाले. त्याशिवाय वनविभागाच्या सहकार्याने १३ हजार घनमीटर हून अधिक क्षेत्रात डीप सीसीटीचे काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी