शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील  ६०७ विद्यार्थ्यांनी दिली ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीची परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 21:36 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर ३ डिसेंबर रोजी पार पडली. त्यात जिल्ह्यातील ३० शाळांमधील ६०७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली.

ठळक मुद्देराणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, वाशिम व जे.डी.चवरे हायस्कुल, कारंजा या दोन केंद्रांवर घेण्यात आली परीक्षाजिल्ह्यातील ३0 शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिली परीक्षापात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असल्यामुळे घटतोय प्रतिसाद!

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर ३ डिसेंबर रोजी पार पडली. त्यात जिल्ह्यातील ३० शाळांमधील ६१० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ६०७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली.आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठव्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सामान्य बौद्धीक क्षमता (१०० गुण), शालेय क्षमता (१०० गुण), विज्ञान (४० गुण), गणित व भूमिती ((२० गुण) आणि समाजशास्त्र (४० गुण) आदी विषयांचा त्यात समावेश असतो. यात उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. दरम्यान, यंदा या परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा आणि कारंजाच्या जे.डी.चवरे हायस्कुल अशा दोन केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. वाशिमच्या केंद्रावर वाशिम, मालेगाव आणि रिसोड तालुक्यातील १३ शाळांमधील विद्यार्थी; तर कारंजाच्या केंद्रावर कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरा या तीन तालुक्यातील १७ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार न घडता परीक्षा सुरळितपणे पार पडली, अश्ी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. नागरे यांनी दिली.

वर्षागणिक घटतोय प्रतिसाद!जिल्ह्यात गेल्या ७ ते ८ वर्षांपासून एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. पुर्वी ८ केंद्रांवरून परीक्षा घेतली जायची. गतवर्षी चार केंद्रांवरून परीक्षा झाली; तर यंदा मात्र केवळ दोनच परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांचा घटता प्रतिसाद यास कारणीभूत मानला जात असून शासनस्तरावरून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची रक्कम प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. 

टॅग्स :examपरीक्षाSchoolशाळाStudentविद्यार्थी