शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत ५१ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 12:17 IST

Mahatma Fule Janaarogya Yojana : ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर १५ तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत गत वर्षभरात ५१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर १५ तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.राज्य शासनाने २०१२ मध्ये राजीव गांधी नावाने आणि आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ३ शासकीय आणि ९ खासगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. या योजनांची माहिती प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना आहेत. अंगीकृत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित रुग्णालयानेसुद्धा विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. रुग्णालयातील आरोग्य मित्रांनी योजनांची तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना देणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत कोविड-१९ वरील उपचारासाठी २० पॅकेजेस व म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी १९ पॅकेजेस उपलब्ध आहेत. गत वर्षभरात या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आरोग्य विभागाला ५१ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर १५ तक्रारीच्या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे कार्यवाही सुरू आहे.

या योजनांची माहिती रुग्णांना देण्यासाठी सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या अनुषंगाने १ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत ५१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, यापैकी ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर १५ तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.- डॉ.रणजित सरनाईकजिल्हा समन्वयक, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना