शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ४८४ शाळेला ‘डिजिटल’ची जोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:35 IST

वाशिम - लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ४८४ शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळाली असून, उर्वरीत २८९ शाळा डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे.

ठळक मुद्देशिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. आनंददायी शिक्षण कसे घेता येईल, यासाठी डिजीटल शाळा करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पुरेशा निधीअभावी प्रत्येक शाळेच्या वर्गखोल्या डिजिटल करणे शक्य नसल्याने लोकवर्गणीवर भर देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानाच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ४८४ शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळाली असून, उर्वरीत २८९ शाळा डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे.शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात अध्ययन, अनुभव प्रदान करता यावे म्हणून जि.प. शाळांना डिजिटलची जोड दिली जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्ययन करणाºया विद्यार्थ्यांना दप्तरमुक्त शिक्षणासाठी बहुतांश शाळांनी पुढाकार घेतला. या माध्यमातून हसत-खेळत शिक्षणप्रणालीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती आणि शिक्षणाप्रती आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आनंददायी शिक्षण कसे घेता येईल, यासाठी डिजीटल शाळा करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पुरेशा निधीअभावी प्रत्येक शाळेच्या वर्गखोल्या डिजिटल करणे शक्य नसल्याने लोकवर्गणीवर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७७३ प्राथमिक शाळा आहेत. शिक्षक, पालक व गावकºयांची लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानांतर्गतच्या निधीतून ४८४ शाळेत डिजिटल वर्गखोली उभारण्यात आली आहे. केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सहकार्यातून तसेच पालक व गावकºयांच्या लोकवर्गणीतून अधिकाधिक शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा