शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांची ४७ टक्के प्रकरणे मदतीसाठी अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:40 IST

Farmer suicides News २०१ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, चालू वर्षातील १० प्रकरणे चौकशीत आहेत. 

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व अन्य कारणांमुळे गत पाच वर्षांत जिल्ह्यातील ४४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी २२९ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, तर ४७ टक्के अर्थात २०१ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, चालू वर्षातील १० प्रकरणे चौकशीत आहेत. शेतकऱ्यांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास कर्जाचा भरणा कसा करावा, या चिंतेने अनेक शेतकऱ्यांची झोप उडते. यातून काही शेतकरी मृत्यूला जवळ करतात, तर काही शेतकरी पर्यायी व्यवस्था शोधून या संकटावर मात करतात. २०१६ ते २०२० या पाच वर्षांत जिल्ह्यात ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदतीचा हात मिळावा, याकरिता सरकारकडून एक लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र, याकरिता आत्महत्येमागे कर्जबाजारीपणा,  नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान आणि पीककर्जासाठी बँकांचा तगादा, नापिकी यांसारखी कारणे असावी लागतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम करणारी समिती हे प्रकरण मदतीसाठी मंजूर होणार की नामंजूर, याबाबतचा निर्णय घेते. गत पाच वर्षात जिल्ह्यातील ४४० पैकी २२९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत, तर २०१ प्रकरणे अपात्र ठरली. २०२० मधील १० प्रकरणे चौकशीत आहेत. 

ही कारणे असतील, तरच मिळते मदत!शेतीसाठी घेतलेले कर्ज परत फेडता न येणे, हे कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून तगादा लावला जाणे, गेली काही वर्षे शेतीमध्ये काहीच न पिकणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेली पिके गमावून बसणे यांसारख्या कारणांनी शेतकऱ्याने आत्महत्या केली, तर अशा पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबाला सरकारकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते.

चालू वर्षात १० प्रकरणे चौकशीत २०२० या वर्षात कोरोनाकाळातही जिल्ह्यातील ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३० आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली, तर ५२ प्रकरणांत जिल्हास्तरीय समितीला नापिकी, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती आदी कारणे आढळून आली नसल्याने ही प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. उर्वरित १० प्रकरणे चौकशीत आहेत. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याwashimवाशिम