शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात १७ दिवसांत ४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 12:28 IST

Corona Deaths : ६० वर्षांवरील कोरोनाबळींची संख्या अधिक असल्याने, ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा वाढत आहे. गत १७ दिवसांत ४२ जणांना मृत्यूने गाठले असून, अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. वेळीच उपचार मिळावे, म्हणून कुणीही अंगावर दुखणे काढू नये, वेळीच चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी आढळला होता. ऑक्टोबर, २०२० ते जानेवारी, २०२१ या काळात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार दिसून आले. फेब्रुवारी, २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, यामध्ये जनजीवन विस्कळीत होत आहे. मृत्यूसंख्याही वाढत असल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गत १७ दिवसांत एकूण ४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने प्रशासनही हादरले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, त्या तुलनेत आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होत नसल्याने संभाव्य विदारक परिस्थितीची चाहूल लागत आहे. ६० वर्षांवरील कोरोनाबळींची संख्या अधिक असल्याने, ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे ठरत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, दमा व अन्य अतिजोखीम गटातील रुग्णांना कोरोना संसर्ग झाला आणि वेळीच निदान झाले नाही, उपचारास विलंब झाला, तर मृत्यूही ओढवतो, अशी परिस्थिती आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अलीकडच्या काळात मृत्यूची संख्याही वाढत असल्याने, प्रत्येकाने कोरोनापासून बचाव म्हणून कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही सहकार्य करून प्रशासनाला सहकार्य करावे.-  डॉ. मधुकर राठोड,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस