शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

४०६ अंगणवाडीतील पोषण आहार वाटप ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 19:23 IST

वाशिम :  अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गतच्या पोषण आहारात खंड पडू नये म्हणून स्थानिक पातळीवर ६७० ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली तर अद्याप ४०६ अंगणवाडीतील पोषण आहार वाटप ठप्प आहे. 

ठळक मुद्देकर्मचा-यांचा संप ६७० ठिकाणी आहार वाटप सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गतच्या पोषण आहारात खंड पडू नये म्हणून स्थानिक पातळीवर ६७० ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली तर अद्याप ४०६ अंगणवाडीतील पोषण आहार वाटप ठप्प आहे. वाशिम जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, तेवढ्याच अंगणवाडी सेविका  कार्यरत आहेत. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे सुरूवातीला बहुतांश अंगणवाडी केंद्रांना कुलूप लागले होते तसेच बालकांचा पोषण आहारदेखील ठप्प होता. संपामुळे कुपोषित बालके व अंगणवाडीतील पोषण आहाराचे लाभार्थी बाधित होऊ नये तसेच आहार पुरवठ्यात खंड पडू नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाला १३ सप्टेंबरला केल्या होत्या. स्थनिक पातळीवरील शासकीय यंत्रणेतील कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य सहायक, आरोग्य सहाय्यिका, ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक शाळेचे शिक्षक, ग्राम शिक्षण समितीच्या सहाय्याने तसेच स्थानिक गरम ताजा आहार पुरविणारे महिला बचत गट आदींच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करावी आणि पोषण आहाराचे वाटप पूर्ववत करावे, अशा सूचना देण्यात मिळाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी महिला व बालकल्याण विभागाला नियोजन करण्याचे निर्देश दिले. महिला व बालकल्याण विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. इंगळे व बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी बचत गट, आशा व सेविकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६७० अंगणवाडी केंद्रांत पोषण आहार वाटपाची पर्यायी व्यवस्था केली आहे. उर्वरीत ४०६ अंगणवाडी केंद्रांत तुर्तास पर्यायी व्यवस्था नसल्याने पोषण आहार वाटप ठप्प आहे. जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी केंद्रांत लवकरच पोषण आहार वाटपाची पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे इंगळे यांनी सांगितले. दरम्यान, वाशिम तालुक्यात १७० अंगणवाडी केंद्र असून, सर्वच ठिकाणी पोषण आहाराचे वाटप सुरू आहे, असे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी ‘लोकमत’शी बोलत सांगितले.