शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या जंगलात ४० कृत्रिम पाणवठे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:51 IST

वनविभागाच्यावतीने जिल्हाभरातील जंगलात प्राथमिक टप्प्यात ४० कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी लोकवस्तीत धाव घेत आहेत. त्यामुळे त्यांचा जीव संकटात येत असून, यावर नियंत्रणासाठी वनविभागाच्यावतीने जिल्हाभरातील जंगलात प्राथमिक टप्प्यात ४० कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात हे पाणवठे जंगलात विविध ठिकाणी ठेवण्यात येतील.वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक जंगलाचा भाग मोठा आहे. या जंगलात विविध प्रजातींच्या हजारो प्राण्यांचा अधिवास आहे. तथापि, या जंगलात पुरेशा प्रमाणात पाणीसाठे नसल्याने हिवाळ्यापासूनच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. हे प्राणी सुरुवातीला शेतशिवारात आणि नंतर उन्हाळ्यात थेट लोकवस्तीपर्यंत धाव घेतात. पाण्यासाठी होत असलेली वन्यप्राण्यांची भटकंती त्यांच्या जिवाला धोका निर्माण करते. कधी वाहनांची धडक लागून, तर कधी मानव-वन्यजीव संघर्षामुळे अनेक प्राण्यांना जीवही गमवावा लागला. हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून, यावर नियंत्रणासाठी वनविभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी केली आहे. यासाठी आवश्यक निधीची तरतूद पूर्वीच झाली असून, सिमेंटचे हे पाणवठे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. साधारण पाच फुट लांब रुंद आणि दोन फुट खोल, तसेच चार फुट लांब, दोन फुट रुंद आणि दोन फुट खोल अशा आकाराचे हे पाणवठे जंगलातील आवश्यक ठिकाणी ठेवले जाणार असून, त्यात पाणी भरण्याची काळजी घेण्यात येणार आहे.

वन्यप्राण्यांची पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबविण्यासाठी जंगलात कृत्रिम पाणवठे ठेवण्यात येणार आहेत. प्राथमिक टप्प्यात ४० पाणवठे तयार करण्यात येत असून, त्याशिवाय पुढील काळात इतरही आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येतील.-सुमंत सोळंके उपवनसंरक्षकवाईल्ड लाईफ (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमforestजंगलforest departmentवनविभाग