शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची ४ महिन्याची मेहनत व्यर्थ ; खर्च जास्त उत्पादन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 12:20 IST

Washim District, Farmer लावलेला खर्च न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

- नंदकिशाेर नारेवाशिम : जिल्हयात झालेल्या जाेरदार पावसासह आलेल्या विविध संकटामुळे शेतकरी पूर्णपणे खचला असून ४ महीन्यापर्यंत जाेपासलेले पीक पाहीजे त्या प्रमाणात न आल्याने खर्च जास्त उत्पादन कमी आले आहे. यामुळे शेतकरी पुढील शेतीचे नियाेजन कसे करावे या चिंतेत सापडला आहे.खरीपात साेयाबीनची पेरणी करण्याकरीता सावकारासह ईतरांकडून कर्ज घेऊन शेतीत साेयाबीनचे नियाेजन केले. एकरी १७ ते १८ हजार रुपयांच्या जवळपास खर्च झाला. उत्पादन मात्र एकरी ४ ते ६ आल्याने शेतकऱ्यांचा खर्च ही निघाला नाही. ज्या शेतकऱ्याला एकरी ४ पाेते साेयाबीन उत्पादन झाले त्याला ३१०० रुपये खिशातून भरावे लागले. ज्यांना ५ पाेते झाले त्यांना ना नफा ना ताेटा मेहनत व्यर्थ तर ज्यांना एकरी ६ पाेते झाले त्यांना ४ महीने मेहनत केल्यानंतर साडेतीन ते ४ हजार रुपये खर्च जाता शिल्लक राहीले. आता शेतकऱ्याने पुढचे नियाेजन कसे करावे असा प्रश्न खुद्द शेतकरीच उपस्थित करीत आहे. अल्पभूधारक शेतकरी पूर्ण खचला.

साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावेळी माेठा फटका बसला आहे. लावलेला खर्च सुध्दा न निघाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे माेडले आहे. लावलेला खर्च न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. काेकलगाव परिसरात एकरी ३ ते ५ पाेत्याचा उतारा आला.- रवी काळबांडेशेतकरी, काेकलगाव

अल्पभुधारक शेतकऱ्याने ४ महीने मेहनत घेऊन खर्च ही नाही निघाला आता त्याने पुढील पिकांचे नियाेजन कसे करावे असा प्रश्न पडला आहे. लावलेला खर्च तर दूरच बल्की शेतकऱ्याच्या खिशातून पैसा गेला आहे. आमच्या परिसरात एकरी ४ साेयाबीनचा उतारा आला आहे. यामध्ये माझ्याकडे सव्वा एकर शेती आहे.- पंडीत उत्तमराव गंगावणे, शेतकरी, देपूळ

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी