शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या गटशेतीसाठी ३९ प्रस्ताव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 16:03 IST

वाशिम: गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीस चालना देण्याची योजना सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीस चालना देण्याची योजना सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत २० शेतकºयांच्या गटाच्या माध्यमातून किमान १०० एकर क्षेत्रावर गटांमार्फत विविध कृषि व कृषिपुरक उपक्रम प्रकल्प स्वरुपात राबविण्यात येणार असून, या योजनेसाठी १० जुलै २०१८ पर्यंतच्या अंतिम मुदतीपर्यंत जिल्हाभरातील ३० गटांचे प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. या योजनेअंतर्गत सलग क्षेत्र किंवा किमान एका शिवारात क्षेत्र असलेल्या, तसेच आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० अथवा कंपनी अधिनियम १९५८ च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक गट अथवा कंपनी म्हणून नोंदणी असलेल्या शेतकºयांकडून कृषी विभागाच्यावतीने अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी निर्धारित केलेल्या १० जुलै २०१८ पर्यंतच्या अंतिम मुदतीत निकषात बसणाºया ३९ शेतकरी गटांचे प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले असून, या योजनेअंतर्गत शेतकरी गट, समुह, उत्पादक कंपनीची प्राथमिक निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती मार्फत केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सुचना कृषी विभागाच्यावतीने शेतकरी गटांना करण्यात आली आहे. या योजनेविषयीची माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर कृषि व पदुम विभागाच्या १३ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयात नमूद आहे.  निर्धारित लक्षांकातून होणार गटांची निवडगटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेंतर्गत जिल्ह्यात ६ गट स्थापन करण्याचा लक्षांक असून, या योजनेसाठी जिल्हाभरातील ३९ शेतकरी गटांचे अर्ज प्राप्त झालेले निर्धारित आर्थिक लक्षांकानुसार प्राप्त प्रस्तावातून शेतकºयांची निवड जिल्हास्तर समितीमार्फत करण्यात येत आहे. निवडलेल्या शेतकरी गटांना कृषीपुरक उपक्रम प्रकल्प स्वरुपात राबविण्यासाठी अनुदान मिळणार असून, यात हॉर्वेस्टर, सिंचन साहित्य, गोडाऊन आदिंच्या खर्चासाठी मिळणाºया अनुदानाचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी