शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांचे मोठे नुकसान

By नंदकिशोर नारे | Updated: February 28, 2023 18:46 IST

सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीने माेठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे नुकसान झाले.

वाशिम - मालेगाव तालुक्यातील करंजी  येथे २८ फेब्रुवारी राेजी पहाटे चार वाजताच्या सुमारास दलित वस्तीत  लागलेल्या आगीत सुधाकर किसन कांबळे यांच्या ३९ बकऱ्या जळून खाक झाल्या.

सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीने माेठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे नुकसान झाले. कांबळे यांच्या बकऱ्यांसाेबतच शेजारी असणारे दत्ता वानखेडे यांच्या सुद्धा म्हशीच्या गाेठ्याला आग लागून त्यांचे लाखाच्यावर नुकसान झाले. आगीमध्ये बाळू खंदारे यांच्या घरातील  अन्नधान्याची नासाडी, शेषराव सिताराम खिल्लारी यांचे गुरांच्या गाेठयातील तीन स्पिंकलर संच, अंदाजे ९० पाईप, व शेतीचे संपूर्ण भांडवल जळून खाक झाले. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु, आग आटोक्यात आली नाही.  शिरपूर पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले,  अग्निशामन दलाने आग विझवून पुढील अनर्थ टळला. घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी, मालेगावचे तहसीलदार, रवी काळे ,तलाठी गणेश बेदरकर, ग्रामसेवक विलास नवघरे, डॉक्टर साळुंखे,  जिल्हा परिषद सदस्य पती सुनील लहाने, पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ खिल्लारे, सरपंच अयोध्या दिगंबर खाडे, उपसरपंच गीता खाडे, माजी सरपंच गोपाल लहाने, माजी सरपंच सुरेश लहाने, गणेश पाटील लहाने व राजू लहाने यांनी घटनास्थळाला भेट दिली.  घटनास्थळाचा पंचनामा करून १० लाख ५१ हजार ८०० रुपये एवढे नुकसान झाल्याचा अंदाज तलाठी गणेश बेदरकर यांनी पंचनामा नाेंदविला. 

टॅग्स :washimवाशिमfireआगFarmerशेतकरी