शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ३७४ शिक्षकांची बदली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 15:12 IST

वाशिम जिल्ह्यात आॅनलाईन अर्ज करणाऱ्या चारही संवर्गातील मिळून ३७४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, ३७ शिक्षक विस्थापित झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया गुरुवारी पार पडली. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात आॅनलाईन अर्ज करणाऱ्या चारही संवर्गातील मिळून ३७४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, ३७ शिक्षक विस्थापित झाले आहेत. शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवार २१ जून रोजी पंचायत समितीस्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत वितरित केले जाणार आहेत.जि. प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी चारही संवर्गातील पदनिहाय व क्षेत्रनिहाय अंतिम बदलीपात्र शिक्षक यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर बदली पोर्टलवर सर्व शिक्षकांची टीयूसी व नॉन टीयूसी अपडेट करून, रिक्त असणारी पदनिहाय जागा प्रसिध्द करण्यात आल्या. त्या रिक्त जागा बदली पोर्टल वर अपडेटही करण्यात आल्या. त्याशिवाय पती-पत्नी समानीकरणाच्या जागा प्रसिध्द करून बदली पोर्टल वर अपडेट करण्यात आल्या. त्यानंतर शिक्षकांनी आॅनलाईन बदली पोर्टलवर अर्ज सादर केले. त्यात संवर्ग १ मधील विविध प्रकारचे आजार, दिव्यांग, परितक्त्या, विधवा, माजी सैनिक पत्नी, दिव्यांग मुलांचे पालक, तर संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरण, तसेच संवर्ग ३ मधील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी बदली पोर्टलवर आॅनलाईन अर्ज केले होते. या तीन संवर्गातील बदल्या निश्चित झाल्यानंतर संवर्ग चारमधील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातील चारही संवर्गातील मिळून ३७४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता बदली प्रक्रिया पार पडली असली तरी, अद्याप आदेश काढण्यात आले नसून, ही प्रक्रिया २१ जून रोजी पार पडल्यानंतर शिक्षकांना बदली आदेश प्राप्त होणार आहेत. यानंतर शिक्षकांचे आक्षेप आणि हरकती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, या प्रक्रियेत समुपदेशनातून मार्ग काढण्यात येईल.जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतंर्गत ३७४ शिक्षकांची बदली झाली; तर ३७ शिक्षक विस्थापित झाले. त्याचे अंतिम आदेश मात्र अद्याप निघालेले नाहीत. २१ जून रोजी सदर आदेश काढले जातील.- अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक