शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

वाशिम जिल्ह्यातील ३,५४० शिक्षकांची हाेणार काेराेना चाचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 11:34 AM

Corona Test ३,५४० शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात असून, आतापर्यंत जवळपास १,५४० जणांची चाचणी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोनामुळे तब्बल १० महिन्यांनंतर सोमवार, २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. तत्पूर्वी जिल्ह्यातील ३,५४० शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात असून, आतापर्यंत जवळपास १,५४० जणांची चाचणी झाली.कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. गत तीन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले आहेत. आता कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याचे पाहून २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पाचवी ते आठवीच्या शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्यात जवळपास ३,५४० शिक्षक असून, आतापर्यंत १,५४० शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचण्या कोठे, किती?

  • तालुकानिहाय शिक्षकांच्या कोरोना चाचणीची सोय कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध केली आहे. 
  • दैनंदिन सरासरी ४० ते ५० शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
  • शक्य तेवढ्या लवकर चाचणी करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.

इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. अशा सूचनाही गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. सरकारी कोविड केअर सेंटर येथे कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबत आढावा घेतला जात आहे.- गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या