लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील मानोरा, रिसोड आणि मंगरूळपीर या तीन पंचायत समित्यांना प्रशासकीय इमारत बांधकामासाठी ३ कोटी २१ लक्ष ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे वर्ग करण्यात आलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी बुधवार, २३ जानेवारीला दिली.राज्यभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या इमारतींचे बांधकाम, फर्निचर यासह उपकामांसाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील रिसोड पंचायत समितीला १० लक्ष, मानोरा पंचायत समितीला ६९.१० लक्ष आणि सर्वाधिक अर्थात मंगरूळपीर पंचायत समितीच्या सुरू असलेल्या नवीन इमारत बांधकामासाठी २ कोटी ४२ लक्ष ६५ हजार असा एकूण ३ कोटी २१ लक्ष ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे तीनही पंचायत समित्यांच्या इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
वाशिम जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांना ३.२१ कोटींचा निधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 17:33 IST