शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ३ हजार शेतकरी मदतीपासून वंचितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 11:32 IST

Agriculture Sector News अतिवृष्टीसह विविध आपत्तीने एकूण ६ हजार  ३९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देकेवळ २ हजार शेतकऱ्यांना आजवर शासनाकडून आर्थिक मदत मिळू शकली.३ हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायमच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीसह विविध आपत्तीने एकूण ६ हजार  ३९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानापोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ५१ लाखांच्या निधीचा प्रस्ताव विभागीयस्तरावर सादर केला. तथापि, केवळ २ हजार शेतकऱ्यांना आजवर शासनाकडून आर्थिक मदत मिळू शकली असून, अद्यापही ३ हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायमच आहे.गतवर्षीच्या अर्थात २०२० च्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तींनी शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविला. त्यात मूग, उडिद, कपाशीसह सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, शासनाने राज्यभरातच झालेल्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजनुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यात महसूल आणि कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या संयुक्त पाहणीत जिल्ह्यातील  ९५५२ शेतकऱ्यांच्या ६ हजार ३५३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले, तसेच ४९ हेक्टर क्षेत्रातील जमिनींचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी केली होती.

गत खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीने मूग, उडिद पीक हातून गेले, तर परतीच्या पावसाने सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले. प्रशासनाने या नुकसानाची पाहणी करून अहवालही सादर केला, परंतू दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी, आम्हाला अद्याप शासनाकडून मदत मिळाली नाही.    - नितिन उपाध्ये, शेतकरी, काजळेश्वर

जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान विविध नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ४.५२ कोटीच्या निधीचा प्रस्ताव विभागीय स्तरावर पाठविण्यात आला होता. त्यापैकी निम्मा निधी मिळाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्यात आली आहे. - शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र