शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

कारंजातील २६ ‘ले-आऊट’चे होणार पुनर्विलोकन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 15:23 IST

कारंजा लाड (वाशिम) : शहर परिसरातील शेतजमिनीमध्ये नियमबाह्यरित्या अकृषक करून यापूर्वी मंजूर केलेल्या ‘ले-आऊट’चे पुनर्विलोकन होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : शहर परिसरातील शेतजमिनीमध्ये नियमबाह्यरित्या अकृषक करून यापूर्वी मंजूर केलेल्या ‘ले-आऊट’चे पुनर्विलोकन होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी आदेश दिले असून, याप्रकरणी चौकशी व महसूल अधिनियमानुसार २६ व ईतर लेआउटचे पुनर्विलोकन करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.तत्कालीन महसूल अधिकारी यांनी अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करून तसेच काही प्रकरणात नगर परिषदेच्या प्रारूप व मंजूर विकास आराखड्यात नमूद केलेल्या आरक्षणाला बाधा पोहचवून तसेच अकृषक अभिन्यासास संबंधित विकास प्राधिकरणाची मान्यता न घेता अकृषक आदेश पारित केलेले आहे. सदर प्रकरणात कारंजा नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल सादर केलेला आहे. सदर प्रकरणाचे व अहवालाचे अवलोकन केले असता, संबंधित तत्कालीन महसूल अधिकारी यांनी अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करून तसेच काही प्रकरणात नगर परिषदेच्या प्रारूप व मंजुर विकास आराखडयात नमुद केलेल्या आरक्षणाला बाधा पोहचवून तसेच अकृषक अभिन्यासास संबंधित विकास प्राधिकरणाची मान्यता न घेता अकृषक आदेश पारीत केलेले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कारंजा यांनी उक्त प्रकरणे पुनर्विलोकन करण्याची परवानगी जिल्हाधिकाºयांकडे मागितली होती. सदर अहवालावरून उपरोक्त प्रकरण  गंभीर स्वरूपाचे असून यामध्ये  अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यामुळे सदर सर्व प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५८ अन्वये पुनर्विलोकन करून नियममानुसार उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे स्तरावर फेर आदेश पारीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी कारंजा यांनी या प्रकरणाचे व अशा स्वरूपाच्या इतर सर्व प्रकरणाचा शोध घेउन अशा सर्व प्रकरणात पूनर्विलोकन करून दोषी आढल्यास तत्कालीन उपविभागीय अधिकारी व तत्कालीन तहसिलदार यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिले आहेत. याप्रकरणा पुढे काय कार्यवाही होते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिम