शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील दलित वस्तीतील २४९ कामे संथगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:05 IST

वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने  समाजकल्याण विभागाने २४९ कामांसाठी साडे नऊ कोटी रुपयांचा निधी आॅक्टोबर महिन्यात संबंधित यंत्रणेकडे वितरित केला. साडेतीन महिन्यानंतरही या कामांना गती आली नाही. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी कामे पूर्ण करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाने संबंधितांना दिल्या आहेत. 

ठळक मुद्देसाडेनऊ कोटींचा निधी कामाला गती देण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने समाजकल्याण विभागाने २४९ कामांसाठी साडे नऊ कोटी रुपयांचा निधी आॅक्टोबर महिन्यात संबंधित यंत्रणेकडे वितरित केला. साडेतीन महिन्यानंतरही या कामांना गती आली नाही. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी कामे पूर्ण करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाने संबंधितांना दिल्या आहेत. दलित वस्तींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी समाजकल्याण विभागातर्फे विविध कामे प्रस्तावित केली जातात. अनेक दलित वस्तींमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही तर काही दलित वस्तींमध्ये ये-जा करण्यासाठी सिमेंट रस्ता नाही तसेच पथदिवे, सभागृह आदी सुविधा नसल्याने दलित वस्त्या विकासापासून कोसो दूर आहेत. दलित वस्तींचा विकास साधण्यासाठी तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील दलित वस्तींमध्ये कामे सूचविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना सूचना दिल्या होत्या. या सुचनेनुसार २४९ कामांना मंजूरात देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कामे मालेगाव तालुक्यात ५२ आहेत. या कामांसाठी १ कोटी ९४ लाख २५ हजार रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. वाशिम तालुक्यात एकूण ४० कामे असून एक कोटी ६७ लाख ६० हजार रुपये, रिसोड तालु्क्यात ४९ कामे असून दोन कोटी सहा लाख २० हजार रुपये, मंगरूळपीर तालुक्यात ४२ कामे असून एक कोटी ४२ लाख २० हजार रुपये, कारंजा तालुक्यात ३८ कामे असून एक कोटी ३९ लाख ५ हजार तर सर्वात कमी कामे मानोरा तालुक्यात २८ कामांसाठी एक कोटी ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर आहे. ३० कामांचा अपवाद वगळता अद्याप उर्वरीत कामे पूर्ण झाली नाहीत. ३१ मार्च २०१८ पूर्वी सर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून कामांना गती द्या, अशा सूचना समाजकल्याण विभागाने दिलेल्या आहेत.  

टॅग्स :washimवाशिमRural Developmentग्रामीण विकास