शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात रस्त्यांसाठी दिला २४ हजार झाडांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:51 IST

Washim News मार्गाच्या कामांसाठी जवळपास २४ हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  (एनएचएआय) अंतर्गत पाच महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. त्यातील या मार्गाच्या कामांसाठी जवळपास २४ हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्या बदल्यात महामार्गांचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी अद्याप त्यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी निम्मीही झाडे लावली नाही. जिल्ह्यात वाशिम-हिंगोली,  अमरावती-हिंगोली,  अकोला-आर्णी, मालेगाव-मेहकर या राष्ट्रीय महामार्गांसह  एक-दोन जिल्हा प्रमुख मार्गांची कामे करण्यात येत आहेत. या रस्त्यांच्या कामात अडसर निर्माण होत असल्याच्या कारणावरून शे-दीडशे वर्षांपूर्वी लागवड झालेल्या जवळपास २४ हजारांहून अधिक वृक्षांची कत्तल झाली. बदल्यात मात्र निम्मेही वृक्ष लावलेले नाहीत.

वृक्षतोड दुर्दैवीच जिल्ह्यात महामार्गाच्या कामांसाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात आली. हा प्रकार पर्यावरणासाठी अत्यंत घातक आणि दुर्दैवी आहे. यामुळे प्रदूषणवाढीस वाव आहे. विशेष म्हणजे  जिल्ह्यातील नेमकी किती झाडे तोडण्यात आली. ती माहिती देण्यासह प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. -गौरव इंगळे,पर्यावरण प्रेमी, 

गत पाच वर्षांत ४४ लाख वृक्षांची लागवडराज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात २०१४-१५ मध्ये ११ लाख ८ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली, तर त्यानंतर राबविण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ४० लाख ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्या  महामार्गा पूर्ण वृक्ष लागवड झाली नाही.

जिल्ह्यात ४२ हजार हेक्टरवर जंगल जिल्ह्याचे भाैगोलिक क्षेत्र ५,१८६ चौरस किलोमीटर आहे. त्यात प्रादेशिक वन विभागाच्या वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव तालुक्यातील परिक्षेत्रात मिळून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर क्षेत्रावर प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रात विविध प्रजातींची हजारो झाडे असून, जिल्ह्यात सोहळ काळवीट अभयारण्य असले तरी ते गवताळ आणि झुडपी जंगल आहे. 

टॅग्स :washimवाशिमenvironmentपर्यावरण