शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाऊबीजेच्या दिवशी मिळणार 'पीएम'चे दोन हजार; पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता उद्या होणार वर्ग

By दिनेश पठाडे | Updated: November 13, 2023 20:12 IST

केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलात आणली.

वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पंधरा वा हप्ता उद्या, १५ नोव्हेंबरला वर्ग केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झारखंड राज्यातील खुंटी येथून सकाळी ११:३० वाजता देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात भाऊबीजच्या दिवशी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलात आणली. योजनेच्या अनुदानामुळे पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. योजनेअंतर्गत १४ वा हप्त्याचे वितरण २७ जुलैला करण्यात आले.  त्याचा लाभ  १ लाख ४५ हजार ६५८ शेतकऱ्यांना झाला. त्यानंतर पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी केवायसी, आधार सिडिंग पूर्ण केल्यामुळे शेतकरी संख्येत भर पडली आहे.  

राज्य शासनाने सुरु केलेल्या नमो महासन्मान योजनेचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी मिळाल्याने पीएम किसानचा १५ वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळेल की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. तथापि, केंद्र शासनाने हा हप्ता देण्यासाठी तारीख निश्चित केले असल्याचे पीएम किसान पोर्टलवर सोमवारी पहावयास मिळाले. 

दीड लाखांवर लाभार्थींना होणार लाभपीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता १ लाख ४५ हजारांवर शेतकऱ्यांना मिळाला. यावेळी केवायसी, आधार सिडिंग न केलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार मिळाले नाही. त्यानंतर मात्र ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. गत काही दिवसांपूर्वी पीएम किसानच्या १५ व्या हप्त्यासाठी  पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली होती. जिल्ह्यातील  दीड लाखांवर शेतकऱ्यांना बुधवारी २ हजार रुपयांचा १५ वा हप्ता मिळणार आहे. दरम्यान, केवायसी आणि आधार सिडिंग न केलेल्या लाभार्थींना हा हप्ता मिळणार नसल्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी