शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

२०० विद्यार्थी अडकले कोटा येथील वसतिगृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 15:32 IST

पश्चिम वºहाडातील जवळपास २०० विद्यार्थी कोटा येथील विविध वसतिगृहात अडकले आहेत.

- संतोष वानखडेवाशिम : वैद्यकीय, आयआयटी यासह अन्य परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी अनेक पालक आपल्या पाल्याला राजस्थान राज्यातील कोटा येथे पाठवितात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परराज्याच्या सीमा बंद असल्याने पश्चिम वºहाडातील जवळपास २०० विद्यार्थीकोटा येथील विविध वसतिगृहात अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना स्वजिल्ह्यात आणण्यासाठी शासन, प्रशासनाने पुढाकार घ्यावा किंवा विद्यार्थ्यांना घेऊन येण्याची पालकांना परवानगी द्यावी, अशी मागणी पालकांमधून समोर आली आहे.कोटा येथे वैद्यकीय, आयआयटी पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी पश्चिम वºहाडातील जवळपास २०० विद्यार्थी गेलेले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन आहे. लॉकडाऊनमुळे पश्चिम वºहाडासह राज्यातून कोटा येथे गेलेले सर्व विद्यार्थी तेथे अडकलेले आहेत. कोटा येथील खासगी शिकवणी वर्ग बंद आहेत, आॅनलाईन क्लासही होत नाहीत. गृहपाठही नाही आणि वसतिगृहाच्या बाहेरही पडता येत नाही. त्यात कोटा शहरात कोरोना रूग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पालकांची चिंता अधिकच वाढली असून, १५ ते १६ वर्षाच्या या मुलांनाही घराची ओढ लागली आहे. या मुलांसोबतच वसतीगृहात असणारी उत्तर प्रदेशातील मुलांना उत्तर प्रदेश सरकारने शासनाच्या गाड्यांमधून स्वराज्यात नेले आहे. या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र सरकारनेदेखील राज्यातील या मुलांना स्वराज्यात आणण्यासाठी व्यवस्था करावी किंवा पालकांना परवानगी द्यावी, अशी मागणी पालकांमधून जोर धरत आहे. यासंदर्भात पश्चिम वºहाडासह मराठवाड्यातील काही पालकांना औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे २१ एप्रिल रोजी निवेदनही दिले आहे.

टॅग्स :washimवाशिमkota-pcकोटाStudentविद्यार्थी