शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’तील २०० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, ६७ अ‍ॅक्टिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 12:09 IST

CoronaVirus गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील तब्बल २०० पोलीस कर्मचारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आले.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जनतेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहणाऱ्या पोलीस दलालाही कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील तब्बल २०० पोलीस कर्मचारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आले. त्यातील ११४ जण कोरोनामुक्त झाले असून ६७ जण सध्या ‘अ‍ॅक्टिव्ह’ आहेत. या काळात एका अंमलदाराचा कोरोनाने मृत्यू झाला. तथापि, सर्वसामान्य नागरिकांसोबतच जनतेचे रक्षणकर्तेही कोरोनापुढे हतबल झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. फेब्रुवारी अखेर कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ८ हजार ९३४ होता. चालू महिन्यात २२ मार्चपर्यंत त्यात तब्बल ४ हजार २६६ने वाढ होऊन सध्या हा आकडा १३ हजार २०० झाला आहे. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांसोबतच प्रशासकीय कार्यालयांमध्ये कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लक्षणे दिसत नसली तरी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने आरटीपीसीआर, अ‍ॅन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढविण्यात आले आहे. त्यानुसार, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत २०० पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील ११४ जण आतापर्यंत उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले; तर ६७ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. एका अंमलदाराचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. 

उन्ह, वारा, पावसाची तमा न बाळगता सदैव जनतेच्या रक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलणारे पोलीस दलातील कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. गेल्या काही दिवसांत २०० कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून ६७ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना तोंडाला मास्क लावून ठेवावे. इतरही खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.- वसंत परदेशी जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या