लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार २५ आॅगस्ट रोजी दिवसभरात एकूण २० रुग्णांची यामध्ये भर पडली. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १४९४ वर पोहोचली आहे. यापैकी ३६५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. दरम्यान, मंगळवारी ४८ व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातन सुटी देण्यात आली.जुन, जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २५ आॅगस्ट रोजी दिवसभरा २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील जुनी आययुडीपी परिसरातील १, काळे फाईल परिसर २, ग्रीन पार्क कॉलनी परिसर १, चंडिकावेस परिसर १, वारा जहांगीर येथील ७, दोडकी येथील १, मालेगाव तालुक्यातील कोयाळी येथील १, कारंजा लाड शहरातील बालाजीनगर परिसरातील १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, आसेगाव पेन येथील ३, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १ अशा २० व्यक्तींचा समावेश आहे तसेच जिल्ह्याबाहेर आणखी ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याची नोंद झाली आहे.आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४९४ वर पोहोचली असून, त्यातील २६ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ११०२ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आता ३६५ जणांवर उपचार सुरू आहेत.
वाशिम जिल्ह्यात २० पॉझिटिव्ह; ४८ कोरोनामुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 19:16 IST