२ टक्के नवजात मुले लठ्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:39 AM2021-03-06T04:39:21+5:302021-03-06T04:39:21+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१९ मध्ये एकूण २,९०० महिलांची प्रसूती झाली. त्या महिलांनी जन्म दिलेल्या बालकांपैकी २,८८१ बालकांचा जन्म सुखरूप ...

2% of newborns are obese | २ टक्के नवजात मुले लठ्ठ

२ टक्के नवजात मुले लठ्ठ

Next

जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१९ मध्ये एकूण २,९०० महिलांची प्रसूती झाली. त्या महिलांनी जन्म दिलेल्या बालकांपैकी २,८८१ बालकांचा जन्म सुखरूप झाला. त्यातील ३३७ मुलांचे वजन २.५ किलोपेक्षा कमी होते, तर उर्वरित नवजात मुलांचे वजन ३ किलोपेक्षा अधिक होते. त्या शिवाय २०२० मध्ये एकूण ३,०९७ महिलांची प्रसूती झाली. त्या महिलांनी जन्म दिलेल्या बालकांपैकी ३,०८२ बालकांचा जन्म सुखरूप झाला. त्यातील ६५९ मुलांचे वजन २.५ किलोपेक्षा कमी होते, तर उर्वरित मुलांचे वजन ३ किलोपेक्षा अधिक होते.

---------

शहरी मुलांचे प्रमाण अधिक

जिल्ह्यात गत दोन वर्षांत जन्मलेल्या बालकांत सरासरीपेक्षा अधिक वजन असलेली अर्थात लठ्ठ असलेली जी बालके होती. त्यामध्ये शहरी भागातील मुलांचे प्रमाण अधिक होते, तर २.५ किलोपेक्षा कमी वन असलेल्या बालकात ग्रामीण भागातील महिलांनी जन्म दिलेल्या बालकांचे प्रमाण थोडे अधिक होते.

------

६ मुलांचे वजन ५ किलो

जिल्ह्यात २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत मिळून एकूण ५,९६३ मुले जन्माला आली. त्यापैकी ९९६ मुलांचे वजन २.५ किलोपेक्षा कमी होते, तर ४,९६७ मुलांचे वजन ३ किलोपेक्षा अधिक होते. जिल्ह्यात केवळ ६ नवजात मुलेच ५ किलोपर्यंत वजन असलेली होती.

------------

मातांच्या आहाराचा प्रभाव

गर्भवती महिलांना पोषण आहार आवश्यक असतो. पूरक पोषण आहार सेवनात असला म्हणजे बाळाच्या प्रकृतीवर त्याचा चांगला परिणाम होतो. पर्यायाने जन्माला येणारे बाळ हे सदृढ असते. अधिक वजन असलेली काही मुले मात्र अ‍ॅनॉर्बल असू शकतात.

-डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

-----------

मुलांच्या जन्माची आकडेवारी

२०१९

एकूण २९००

मुले

१,४९१

मुली

१,३९०

तीन किलोपेक्षा अधिक वजनाची मुले

२,५४४

-------------

२०२०

एकूण ३,०९७

मुले

१,५९९

मुली

१,४८३

तीन किलोपेक्षा अधिक वजनाची मुले

२,४२३

-----------

Web Title: 2% of newborns are obese

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.