शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

आणेवारी जास्त असल्याने मंगरुळपीर तालुक्यातील १९ गावे पीकविमा व दुष्काळ सुविधेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 14:02 IST

मंगरुळपीर : तालुक्यातील १३८ पैकी ११८ गावांची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत असून उर्वरित १९ गावांची आणेवारी जास्त असल्याने या गावातील शेतकऱ्यांना पीकविमा व ८ प्रकारच्या दुष्काळी सुविधांपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्दे ७७४ गावांमध्ये आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या गावांना त्याचा लाभ विविध रूपाने मिळणार आहे.१९ गावांची अंतिम आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या १९ गावातील लोकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे.

- नाना देवळे 

मंगरुळपीर : तालुक्यातील १३८ पैकी ११८ गावांची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत असून उर्वरित १९ गावांची आणेवारी जास्त असल्याने या गावातील शेतकऱ्यांना पीकविमा व ८ प्रकारच्या दुष्काळी सुविधांपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.          तालुक्यात मागील खरीप हंगामात दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात उत्पादनात फटका बसला आहे. शासनाने दुष्काळाची परिस्थिती विचारात घेता ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ उपाययोजना लागू केल्या होत्या. वाशिम जिल्ह्यतील ७७४ गावांमध्ये सन २०१७-१८  मधील अंतिम आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या गावांना त्याचा लाभ विविध रूपाने मिळणार आहे. जमीन महसूल सूट, सहकारी कजार्चे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५० टक्के सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पाणीपुरवठ्यासाठी टँकर, टंचाईग्रस्त गावात कृषी पंपाची वीज खंडित न करणे अशा विविध सुविधांचा लाभ या गावांमधील शेतकऱ्यांना होणार आहे. मंगरुळपीर तालुक्यातील १३८ पैकी ११८ गावांचा यात समावेश आहे. सन २०१७-१८ मधील खरीप हंगामातील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या गावातील शेतकºयांना मोठ्या प्रमाणात पीक विमा योजनेचा लाभसुद्धा मिळत आहे. मात्र १९ गावांची अंतिम आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या १९ गावातील लोकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे.  अंतिम आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या गावांमध्ये शेलुबाजार, लाठी, चिखली, नांदखेडा, मालशेलु, वनोजा, येडशी, गोगरी, हिरंगी, खेरडा बु, खेरडा खु, चोरद, जनुना खु, शेंदूरजना मोरे, मजलापूर, भुर, पूर, रुई व तांदली या गावाचा समावेश आहे. त्यामुळे या गावांमधील शेतकऱ्यांना पीक विमा तसेच जिल्ह्यातील ७७४ गावांना मिळणार असलेल्या जमीन महसूल सूट, सहकारी कजार्चे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५०  टक्के सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पाणीपुरवठ्यासाठी टँकर, टंचाईग्रस्त गावात कृषी पंपाची वीज खंडित न करणे या सुविधांचासुद्धा लाभ मिळणार नसल्याचे समजते. जिल्ह्यात सध्या पीक विमा रकमेचे वाटप जोमात सुरू असून पहिल्यांदाच आणेवारी कमी असल्याने शेतकºयांना घसघशीत पीकविमा मिळत आहे. ऐन अडचणीच्या कामात पीक विमा मोबदला कामी येत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. अशातच  पीक विमा न काढणारे शेतकरी मात्र या लाभापासून वंचित राहिले आहेत. आता या वंचित शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त आणेवारी असलेल्या १९ गावातील शेतकरी सुद्धा सोबती झाले आहेत. इतर गावातील शेतकऱ्यांना  इन्शुरन्स कंपनीकडून बऱ्यापैकी विमा मिळत असतांना विमा भरूनसुद्धा विमा मिळण्याची शक्यता  आणेवारी जास्त असलेल्या १९ गावांमध्ये नाही त्यामुळे शासकीय आकडेवारीच्या गोंधळात सापडून या गावांमधील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा पिक विमा मोबादल्यापासून वंचित राहावे लागणार असल्याने शासनाने सरसकट तालुक्यातील गावांना ५० टक्क्यांच्या आतील अंतिम आणेवारी लागू करून शेतकºयांना पीक विमा व दुष्काळी सुविधांचा लाभ देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा