शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १.७६ कोटींचे वितरण; खात्यात जमा होतेय रक्कम

By दादाराव गायकवाड | Updated: September 24, 2022 15:52 IST

जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटीचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

वाशिम : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात संततधार पाऊस आणि अतिवृष्टीने लाखो हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटीचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत संततधार पाऊस झाला. या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४९ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीने अनेक भागातील जमिनी खरडून गेल्या आहेत. जुलै महिन्यात बरसलेल्या पावसामुळे १२९७.७२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होऊन ५८५६ शेतकऱ्यांना फटका बसला. ऑगस्ट महिन्यात १.४२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जून ते ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला. या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात जून ते जुलै महिन्यातील नुकसानापोटी १.७६ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला. हा निधी २२ सप्टेंबर रोजीच तहसीलस्तरावर वर्ग करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधीची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मालेगाव, कारंजा आणि मानोरा या तीनच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १ कोटी ७६ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वितरण सुरू आहे.

मालेगाव तालुक्यात नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक -जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक १२८६.६० हेक्टरवर पिकांचे नुकसान मालेगाव तालुक्यात झाले. त्याखालोखाल कारंजा तालुक्यात, तर मानोरा तालुक्यात अत्यल्प नुकसान झाले. उर्वरित मंगरुळपीर, वाशिम व रिसोड तालुक्यात ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान ‘निरंक’ असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही.

कोणत्या तालुक्यासाठी किती निधी -मालेगाव - १,७४,८३,८००कारंजा - १,१२,८००मानोरा - ५४,४००

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारRainपाऊस