शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यातील काजळेश्वर-खेर्डा मार्गावर  कार उलटल्याने १७ वर्षीय मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 15:54 IST

कारंजा लाड: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून घडलेल्या अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कारंजा तालुक्यातील काजळेश्वर-खेर्डा मार्गावर उमा नदीच्या पुलानजिक घडली.

ठळक मुद्देकाजळेश्वरनजिक असलेल्या उमा नदीच्या पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार उलटली. पार्थ मोहन आगे (१७), असे मृतकाचे, तर अभिजित प्रल्हाद सुलताने (३५), क्षीतीज किशोर भड  (२४) व श्रेयश अभिजित सुलताने (०४) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.सर्व जखमींना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

कारंजा लाड: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून घडलेल्या अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कारंजा तालुक्यातील काजळेश्वर-खेर्डा मार्गावर उमा नदीच्या पुलानजिक घडली.  पार्थ मोहन आगे (१७), असे मृतकाचे, तर अभिजित प्रल्हाद सुलताने (३५), क्षीतीज किशोर भड  (२४) व श्रेयश अभिजित सुलताने (०४) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

तालुक्यातील काजळेश्वर येथील महादेव भड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सावडण्याच्या कार्यक्रमासाठी घरी आलेल्या काही पाहुण्यांपैकी चालक अभिजित प्रल्हाद सुलताने, क्षीतीज किशोर भड , श्रेयश अभिजित सुलताने आणि पार्थ मोहन आगे, हे चौघे मुलीला आणण्यासाठी  एमएच-२७, टी-१३२ क्रमांकाच्या कारने काजळेश्वर येथून कारंजाकडे येत होते. दरम्यान काजळेश्वरनजिक असलेल्या उमा नदीच्या पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार उलटली. या अपघातात पार्थ मोहन आगे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर  अभिजित प्रल्हाद सुलताने, क्षीतीज किशोर भड, श्रेयश अभिजित सुलताने (०४) हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती कळताच सर्वधर्मआपत्कालीन संस्थेचे शाम सवाई व सचिन हाते यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वृत्त लिहित असेपर्यंत या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात