शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

२०७ शेतकऱ्यांच्या खात्यात १.५८ कोटींची रक्कम जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:18 IST

पहिल्या टप्प्यात २०७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १.५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यात एप्रिल २०१५ पासून पीक कर्ज थकीत असलेले १ लाख ५ हजार शेतकरी दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २०७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १.५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून उर्वरित शेतकºयांच्या प्राप्त याद्यानुसार कार्यवाही सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी शनिवार, २९ फेब्रूवारी रोजी दिली.जिल्ह्यातील कळंबा महाली येथील १७१ आणि सावरगाव बर्डे येथील २६६ अशा ४३७ शेतकºयांची बँक खात्यात प्रथम कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची ‘ट्रायल’ प्रशासनाकडून घेण्यात आली. त्यापैकी आधार प्रमाणिकीकरण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या २०७ शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची १.५८ कोटींची रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, उर्वरित सर्व पात्र शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या असून जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील तहसीलदारांकडेही पाठविण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकºयांना आधार प्रमाणिकीकरण करावे लागणार असून आपले सरकार सेवा केंद्र, बँकांसोबतच त्या-त्या गावांमधील स्वस्त धान्य दुकानांवरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे.

‘बायोमेट्रीक’वर वृद्ध शेतकºयांच्या बोटांचे ठसे उमटेनायापूर्वी प्रायोगिक तत्वावर प्रशासनाने कळंबा महाली आणि सावरगाव बर्डे या दोन गावांतील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ४३७ शेतकºयांची यादी जाहीर केली; मात्र त्यातील २०७ शेतकºयांच्याच बँक खात्यात रक्कम जमा झाली. अनेक वृद्ध शेतकºयांच्या बोटांचे ठसे ‘बायोमेट्रीक मशीन’वर उमटले नाहीत, असे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिल्याची माहिती मिळाली.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड झाल्या असून आधार प्रमाणिकीकरण प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. शेतकºयांनी नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, बँकेत अथवा स्वस्त धान्य दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी