शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वाशिम : १.७९ लाख शेतकऱ्यांना १३९.९९ कोटींची मदत वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 13:50 IST

२ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असून त्यांना मदतीसाठी शासनाकडून १७९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असून त्यांना मदतीसाठी शासनाकडून १७९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. १७ डिसेंबरअखेर त्यातील १.७९ लाख शेतकºयांना १३९.९९ कोटींचे बँकांमार्फत वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख ८३ हजार ६५६ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिके, २९०५ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिके आणि ४३४ हेक्टर फळपिकाखालील क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात एकूण २ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असन मदतीकरिता १९७ कोटींचा निधी अपेक्षित असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार, राज्यशासनाने १९ नोव्हेंबरच्या शासन निर्णयान्वये ५६.५१ कोटी आणि १३ डिसेंबरच्या शासन निर्णयान्वये १२३.४८ कोटी असा एकूण १७९.९९ कोटींचा निधी मंजूर केला. १७ डिसेंबरअखेर या निधीपैकी १.७९ लाख शेतकºयांना १३९.९९ कोटींचा निधी वितरित करण्यात आला. मदत वाटपात वाशिम जिल्हा क्रमांक एकवर

अवकाळी पावसाने पीक नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी मंजूर झालेला मदतनिधी वाटपाची प्रक्रिया सद्या सुरू असून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक गतीने मदतनिधी वाटपात वाशिम जिल्ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. १७ डिसेंबरअखेर प्राप्त निधीच्या ७७ टक्के निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी